
नांदेड। आरक्षण हक्क संवर्धन समितीच्या वतीने दिनांक 2. ऑक्टोबर पासून आयटीआय कॉर्नर माता सावित्रीबाई फुले स्मारक नांदेड येथे आमरण उपोषण सुरू असून उपोषणार्थी शितल भवरे यांची प्रकृती खालावली आहे.
महाराष्ट्र सरकारने कंत्राटी पद्धतीने वर्ग क पासून ते वर्ग दोन पर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती या कंपनीमार्फत कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या करण्यात आलेल्या आहेत, या शासन निर्णय विरोधात व राज्यातील जिल्हा परिषदेच्या 62000 शाळांचे दत्तक योजना जाहीर केली आहे त्या योजनेच्या विरोधामध्ये तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही दोन वर्षापासून मिळत नाही आणि ही शिष्यवृत्ती महागाई निर्देशांकानुसार मिळाली पाहिजे आणि ओबीसींना घटनात्मक आरक्षण मिळाले पाहिजे. या मागण्यांसाठी 2 ऑक्टोबर पासून उपोषणास बसलेले उपोषणार्थ शितल भवरे,विनोद वाघमारे,कावेरी ढगे यापैकी शितल भवरे यांची प्रकृती प्रचंड प्रमाणात खालावली असून त्यांनी उपोषणाचा निर्धार कायम ठेवला आहे.
यावेळी उपस्थित असलेले आरक्षण हक्क संवर्धन समितीचे संघटक श्याम निलंगेकर,लता बंडगर,विलास भालेराव, एडवोकेट प्रशांत कोकणे दलित सेनेचे राज्य संघटन सचिव संजय वाघमारे,भीम प्रहार चे दीपक पवळे, प्रमोद वैद्य, माजी प्राचार्य गिरीश चौडेकर,यशवंत ढगे, प्राध्यापक देविदास इंगळे,अदि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
