उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या मौजे घोडज ता. कंधार येथे राष्ट्रीय कृषी नार्बाड व सगरोळीच्या माध्यमातून एकात्मिक पाणलोट विकास आणि हवामान बदल अनुकूल प्रकल्पच्या माध्यमातून नुकताच जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली.यास शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घोडज नगरीचे सरपंच आत्माराम पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून श्री. वाटोरे ( मंडळ कृषी अधिकारी कंधार) सौ.पानपट्टे एस. एन. ( कृषी सहायक) ,व्हि.बी.पुलकुंडवार ( सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा कंधार) , तसेच वीरपक्षी ऋषी महाराज पाणलोट विकास समितीचे अध्यक्ष भगवान बाबा केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी गावातील शेतकरी,नागरिक यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री वाटोरे म्हणाले की , जागतिक मृदा दिन विषयावर शेतकऱ्यांना शेतीमध्ये जास्त प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या खता विषयी व औषधी फवारणी कशी करावी याचे अनमोल असे मार्गदर्शन केले.पुढे म्हणाले की , शेतकऱ्यांनी हवामाना नुसार मातीची तपासणी करून घ्यावी , त्यामुळे आपल्याला ॠतू प्रमाणे शेतात पिक उत्पादन वाढीसाठी आवश्यक त्या बाबी लक्षात घेता येतं.अतिरिक्त खतावरील होणारा खर्च कमी होईल ,व त्याच बरोबर आपली माती मृत्त होणार नाही.तसेच जमिनीत सेंद्रिय कर्ब सुधारण्यासाठी गांडुळ खत, कंपोस्ट खत, निंबोळी पावडर, यांचा वापर करावा, तसेच माती तयार होण्यासाठी लागणारा कालावधी व त्यातील असलेले विविध घटक याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
शेतीमध्ये शेतकऱ्यांनी लिंबोळी आळी, दशपर्णी अर्क, जीवामृत असे सेंद्रिय पद्धतीने घरच्या घरी औषधी निर्मिती करून फवारणी करावी असे आवाहन केले. त्यानंतर सौ.पानपट्टे व विनोद पुलकुंडवार यांनी कृषी विभागातील विविध योजना शेतकऱ्यांना सांगितल्या.यामध्ये मागेल त्याला शेततळे , पांडुरंग फुंडकर योजना , फळबाग लागवड विषयी, कुक्कुटपालन , शेळीपालन ,पनीर निर्मिती, सोयाबीन पिकांपासून अशा विविध शासकीय योजनांची व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या सर्व योजना ३५ टक्के अनुदानावर असून शेतकऱ्यांच्या वैयक्तिक किंवा गटांना देता येते.अशा अनेक योजनांची माहिती व जागतिक मृदा दिनानिमित्ताने उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गंगाधर कानगुलवार ( प्रकल्प व्यवस्थापक) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीपकुमार भिसे, चंद्रकांत बाबळे, ईरशाद सय्यद, लक्ष्मण चव्हाण, राहुल तोरणे, व्यंकटी मिरकुटे, यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रदीपकुमार भिसे यांनी केले.यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.