समाज कल्याण पुढे निदर्शने करून डीवायएफआयचे बेमुदत साखळी उपोषण सुरु
नांदेड। डेमो्क्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमो्क्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने समाज कल्याण कार्यालया समोर दि.२ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता तीव्र निदर्शने करण्यात आली.
निदर्शने संपल्या नंतर डीवायएफआय आणि सीआयटीयू च्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्यात आले. स्वाधार,महाडिबीटी आणि अट्रॉसिटी कायद्यानुसार फिर्यादी असलेल्या पीडिताना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी ह्या प्रमुख मागण्यासाठी वरील संघटना मागील दीड ते दोन वर्षांपासून प्रयत्नशील आहेत.
परंतु अत्यंत उदासीन असलेले सरकार आणि प्रशासन विशेषतः या दलितांच्या आणि मागासवर्गीयांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
युवक आणि विद्यार्थी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढून उपरोक्त मागण्या केल्या असताना अद्याप मागण्या सुटत नसल्याने युवक,विद्यार्थी आणि कामगार डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्यायभवन,समाज कल्याण कार्यालया पुढे उपोषणास बसले आहेत.
उपोषणात डीवायएफ आणि सीटू चे कार्यकर्ते सामील आहेत.यावेळी कॉ. गंगाधर गायकवाड, डीपीआय ग्रामीण जिल्हा अध्यक्ष तेजस भिसे, कॉ.संतोष शिंदे,कॉ.लता गायकवाड,मुकिंदर कुडके आदींची भाषणे झाली. या आंदोलनाचे नेतृत्व दिवायएफआयचे नांदेड तालुका निमंत्रक कॉ. श्याम सरोदे, कॉ.विजय सरोदे, कॉ.लखन कंधारे,अर्जुन गायकवाड, कॉ.सचिन सरोदे, कॉ.अर्जुन गायकवाड, कॉ. मारोती केंद्रे, कॉ. मो.रफिक, कॉ.शरद रणवीर आदिजन करीत आहेत.