नांदेड, अनिल मादसवार| हमारी मांगे पुरी करो असे म्हणत आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करताच हिमायतनगर पोलिसांनी गोळीबार व मॉब ड्रिल करत दगडफेक करणाऱ्या आरोपीना ताब्यात घेतले. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील पोलिसांच्या वतीने आज येथील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय मैदानात तीन पोलीस अधिकारी 12 पोलीस आमदार व 15 होमगार्ड यांचे पथकाने आगामी होणाऱ्या मराठा आरक्षण संबंधाने मॉब ड्रिलचे प्रात्यक्षिक दाखवीले आहे.

यावेळी पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांनी जनतेला आवाहन केले कि, मराठा आरक्षण मागणी शांततेने करणार्यांना आंदोलनकर्त्यांना आमचे सहकार्य राहणार आहे. तसेच आंदोलनकर्त्यांनी देखील पोलिसाना सहकार्य करून शांततेत आंदोलन करावे. कोणीहि कायदा हातात घेतल्यास शासन नियमानुसार त्यांचेवर कार्यवाही करावी लागेल असा इशाराही यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

आंदोलन कर्त्यांनी दगडफेक केली, दंगलीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोलीस पोहोचले. आणि मॉक ड्रील सुरू होण्यापूर्वी सर्व पोलिसांनी गोळ्या झाडल्या यात आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रण आणली याबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कायदा व सुव्यवस्थेच्या काळात पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी गर्दीला तोंड देण्यासाठी आंदोलनकर्त्यांना ताब्यात कसे घायचे याबाबत गोळीबार आणि सराव केला. यावेळी परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय परिसरात आंदोलनाकर्त्यांच्या बंडखोरीला तोंड देण्यासाठी पोलिसांना पोलीस निरीक्षक बी डी भूसनुर यांनी टिप्स दिल्या.

