हदगाव, शेख चादपाशा| मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तीळ महागले असून, तिळाचे भाव गगनाला भिडल्याने संक्रांतीच्या सणामध्ये एक तिळ सात जणांनी वाटुन खाल्ला अस म्हणण्याची वेळ आली आहे. इम्युनिटी वाढवण्यामध्ये तिळ लाभदायी असून, यामुळे हाडाची मजबुती होते असेही सांगितले जात आहे. त्यासाठी तालुका परिसरात तिळाच्या लागवड क्षेत्रात वाढ करणे महत्वाचे असून, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
हदगाव तालुक्यात तीळाचे लागवड क्षेत्र कमी होत असल्याने व्यापारी तिळगुळाचे पदार्थ व्यापारी गुजरात मधुन मागवीत असल्याची माहीती आहे. गुजरात मध्ये तिळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत आहे. या पीकाच्या बाबतीत स्थानिक कृषि विभागाने जनजागृती करने आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.
नवीन वर्षाच प्रथम सण म्हणजे ‘मकर संक्रात’ या सणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ‘तीळ गुळ घ्या गोड.गोड बोला असे म्हणत हा सण साजरा केला जातो. यावेळी हदगाव तालुक्यात प्रथम अल्प नंतर अतिवृष्टी या मुळे तीळाचे उत्पादन घटल्याचे दिसुन येत आहे. या बाबतीत माहीती घेतली असता मागील काही वर्षापासून तीळाचा पेरा कमी होत आहे. काही बोटावर मोजण्याइतके शेतकरी काही प्रमाणात ते पण शेताच्या एका सरीत एक ओळ घेत असल्याचे दिसुन येत आहे.
तीळाचे वाढते दर माञ सर्वसामान्याना खिशाला काञी लावणारे आहे. या बाबतीत माहीती घेतली असता एक किलो तीळा करिता 160 ते 170 रु तर गुळा करि प्रति किलो 50 ते 70 रुपये मोजावे वाहत आहे. या बाबत माहिती घेतली असता तिळाच उत्पादन घडल्याचा हा परिणाम असल्याचे काही शेतकरी व व्यापारी सांगत आहेत.
किरकोळ बाजारात तिळाचे भाव वाढलेले दिसुन येतात. महाराष्ट्रात खरिप हंगामात तीळाचे पीक घेण्यात येते. अन्य काही राज्यात रब्बी हंगामात तीळाचे उत्पादन घेण्यात येते. आपल्याकडे तीळाचे उत्पादन वाढविण्या करिता कृषि विभागाने जनजागृती करणे आवश्यक आहे. कारण तिळामध्ये असलेले गुणधर्म हे हाडांना मजबुती करण्यापासून ते शहरीराच्या पचन क्रियेवर परिणाम करणारे आहे. या पीकाच्या बाबतीत शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे. जर अशी परिस्थिती राहीली तर ‘एक तीळ सात जणांनी खाल्ला अशी स्थिती उदभवण्याची शक्यता निर्मान झाली नाही तर नवलच म्हणावं लागेल.
तिळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक हाडांसाठी पोषक ठरतात. थंडीच्या दिवसात तीळ खाण्याची सवय ठेवल्यास हाडं किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवणार नाही. दिवसातून एकदा तुम्ही मोठा चमचाभर तीळ खाल्लेत, तर तुमचे दातही मजबूत होतील. तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स उच्च प्रमाणात असल्यामुळे रोग प्रतिकार शक्तीही वाढते. तिळात सेसमीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. त्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्यास मदत होते. त्यामुळे फुफ्फुस, पोट, गर्भाशय, स्तन, रक्त (ल्युकेमिया) यांचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी करतात. याशिवायही तीळ बहुगुणी आहे.