नायगाव, रामप्रसाद चन्नावार। सध्या पुढा-याना गावबंदी असल्याने अनेक ठिकाणी त्यांच्यासी उडालेले खटके आपण पाहत आहोत.पण रातोळी ता.नायगाव येथे इच्छापूर्ती महादेव मंदिर कलशारोहण व शिवलिंग प्राणप्रतिष्ठा निमित्त गावकऱ्यांनी दिलेले निमंत्रण स्वीकारून अनेक राजकीय पुढाऱ्यांनी उपस्थिती लाऊन भक्तीमय वातावरणाचा आनंद घेतला.
३ जानेवारी २०२४ रोजी रातोळी येथे गावकऱ्यांच्या वतीने आयोजित केलेल्या अखंड शिवनाम सप्ताह परमरहस्य पारायण सोहळा व इच्छापूर्ती महादेव मंदीराचा कलशारोहणाचा कार्यक्रम धार्मिक वातावरणात पार पाडला. गावकऱ्यांनी सुनियोजित नियोजन करून , गावातील सर्व जाती धर्माच्या गुरूवर्यना निमंत्रित करून शिष्यांना दर्शन घडविले.तसेच कार्यक्रमाच्या सांगते निमित्त जिल्ह्यातील पुढा-यानाही निमंत्रित करण्यात आले होते.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठरलेली गावबंदी राजकीय पुढाऱ्यांसाठी आव्हानच ठरत आहे.परंतू नवीन वर्षातील हा पहिला धार्मिक कार्यक्रम राजकीय नेत्यांना दिलासा देणारी ठरली,व महाप्रसादाचा लाभ मिळविला.या कार्यक्रमास माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ . वसंतराव पाटील चव्हाण, आ. राम पाटील रातोळीकर, आ.तुषार राठोड, माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, प्रणिताताई देवरे, मारोतराव कवळे गुरूजी, अशोक पाटील मुगावकर, विजय पाटील चव्हाण, हणमंतराव पाटील चव्हाण,प्रा.रविंद्र चव्हाण आदी मंडळी उपस्थित होती .
माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या वतीने आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ घेऊन हर हर महादेव म्हणत उपस्थित पुढा-यांनी गावबंदी असतांनाही नवीन वर्षाची सुरुवात धार्मिक कार्यक्रमांनी केली.