नायगाव शहरातील मानाचा पालखीच्या गणपतीला मनोभावे निरोप देत विसर्जन सोहळा थाटात संपन्न
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। 73 वर्षाची परंपरा असलेल्या कै बळवंतराव चव्हाण ,कै विठ्ठलराव पाटील कल्याण कै, गोविंदराव गंजेवार, कै नागोराव पाटील बोमनाळे, कै विठ्ठलराव बेळगे ,यांच्या संकल्पनेतून बहात्तर वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या सार्वजनिक मानाचा पालखीचा नवसाला पावनारा गणपतीची स्थापना लोकप्रतिनिधी, व्यापारी, गावकरी, यांच्या संकल्पनेतून करण्यात आली तीच परंपरा त्यांच्या वारसासह लोकप्रतिनिधी व्यापारी गावकरी चालवीत आहेत.
सार्वजनिक गणेश मंडळ मानाचा पालखीचा नवसाला पावणाऱ्या कॄषी उत्पन्न बाजार समिती यार्डात स्थापना करण्यात आलेल्या गणरायाचे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणरायाची महाआरती माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आल्यानंतर मानाच्या गणपतीचा प्रसाद स्वरूपात नारळाची बोली लावण्यात आले या बोलीत गणेश पाळेकर यांनी हा प्रसाद स्वरूपात नारळ पस्तीस हजार रुपये मध्ये घेतला.
त्यानंतर पालखीच्या मानाच्या गणपतीची सजवलेल्या पालखीतून भव्य दिव्य ढोल ताशा टाळ मृदंगाच्या गजरात आतिशबाजीत भगव्या पताका घेऊन मिरवणूक नायगाव शहरातील मुख्य रस्त्यावरून जुन्या गावातील हनुमान मंदिरापासून निघाली यावेळी माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण , केशवराव पाटील चव्हाण हनमंतराव पाटील चव्हाण व उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, वसंतराव मेडेवार, चंद्रकांत कवटीकवार, भगवानराव लंगडापुरे , बाबू सावकार आरगुलवार, उत्तम सावकार वट्टमवार, देविदासराव बोंमनाळे, संगमनाथ सावकार कवटिककवार, बालाजी बच्चेवार,,सतीश मेडेवार , सतीश लोकमानवार , श्रीनिवास जवादवार ,प्राचार्य जीवन चव्हाण, नरहरी सावकार आरगुलवार, गजानन चौधरी, रामप्रसाद चन्नावार.साईनाथ मेडेवार, शंकर लाब्दे, पांडू पाटील चव्हाण ,संजय पाटील चव्हाण, विनोद गंदेवार, मनोज गंदेवार, गजानन फुलारी, शंकर बेळगे, प्रल्हाद पाटील बोमनाळे, नायगाव तालुक्यातील नायगाव पोलीस स्टेशन च्या हद्दीत 35 गावात 64 गणरायाची स्थापना करण्यात आली पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर,व यांचे सर्व सहका-यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.तर रामतीर्थ पोलीस स्टेशन हद्दीत 45 गावात 88 गणरायाची स्थापना करण्यात आली.
रामतिर्थ ( शंकरनगर ) चे स पो नि संकेत दिघे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.कुंटूर पोलीस स्टेशन हद्दीत 47 गावांमध्ये 101 गणरायाची स्थापना करण्यात आली सह पो नी विशाल बहात्तरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तिन्ही पोलिस ठाण्याचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व एकुण 127 गावांमध्ये 253 गणरायाचे मनोभावे ” तूच सुखकर्ता तूच दुखहरता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा ” गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकरी या आशा निनादात विसर्जन शांततेत पार पढले व कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.