लोहा विधानसभेत ८५ वर्षा वरील ११७ , सैनिकाचे ९३१ ,पोस्टल २७३तर ईडीसी २३४ मतदार
लोहा। लातूर लोकसभा मतदार संघात लोहा विधानसभा क्षेत्राचा समावेश होती.७ मे रोजी येथे मतदान होत आहे.८५ वर्षा वरील ९३ मतदार व दिव्यांग २४ असे ११७ मतदाराना त्याच्या घरी मतपत्रिका देऊन मतदान करून घेतले जात आहे यासाठी अकरा टीम कार्यरत असून ४ मे आखरीं दिवस आहे. सैनिक मतदार९३१ आहेत त्यात १५ स्रिया आहेत पोस्टल २७३ तर ईडीसी २३४ मतदार आहेत.
लातूर लोकसभा मतदार संघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार याच्या मार्गदर्शना खाली गेल्या दीड महिन्या पासून ३२ वेगवेगळ्या टीम मध्ये जवळपास साडे तीनशे कर्मचारी निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी कार्यरत आहेत लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे याचे मोठे योगदान लाभते आहे.
नायब तहसीलदार रेखा चमनर, संजय भोसीकर, अनिल परळीकर, अशोक मोकले, उर्मिला कुलकर्णी, श्री पाठक, गायंगे, तिरुपती मुंगरे, गंगाधर गोंटे सुरेश वनजे तलाठी मारोती कदम, समन्वयक मन्मथ थोटे ईश्वर धुळगंडे ,दयानंद,मळगे, सूर्यकांत पांचाळ, माधव भालेराव , यासह विभाग प्रमुख, नोडल ऑफिसर निवडणूक काळासाठी परिश्रम घेत आहेत.
लोहा मतदार संघात ८५ वर्षा वरील ९३ मतदार व दिव्यांग २४ असे एकूण ११७ मतदार आहेत त्यापैकी ७५ जणांनी व दिव्यांग २४ असा ९९ जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे . उर्वरित १८ मतदारांना ४मे शेवटची तारीख आहे यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी नायब तहसीलदार अशोक मोकले याना नोडल ऑफिसर नियुक्त केले आहे.माधव पवार, अशोक मोरे, महेंद्र कांबळे, डी बी शेख,चाटे मॅडम, हे परिश्रम घेत आहेत.यासाठी ११ टीम तयार करण्यात आल्या असून त्या मतदाराच्या घरी मतपत्रिका घेऊन जात आहेत व मतदान झाल्या नंतर मतपेटीत टाकत आहेत
सीमेवर ९३१ मतदार त्यात १५ स्रियांचा समावेश
———————————-
लोहा मतदार संघात ९३१ सैनिकांचे मतदान आहे त्यात १५ महिला सैनिकांचा समावेश असून त्यांचे पोस्टल मतपत्रिका द्वारे मतदान होणार आहे.मतदाना पासून कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रशासन काळजी घेत आहे.
● पोस्टल२७३ तर ईडीसी २३४ मतदार
————— —————-/-
लोहा मतदार संघातील मतदान प्रतिक्रियेत असलेल्या होमगार्ड, पोलीस कर्मचारी व इतर कर्मचारी असे २७३ मतदार आहेत त्याचे पोस्टल मतदान आहे तर २३४ ईडीसी मतदार आहेत .हे मतदार कोणत्याही मतदान केंद्रावर प्रमाणपत्र दाखवून करता येणार आहे.
● बीएलओ कडून मतदारांना “वोटर स्लिप ” वाटप
———— ——-
लोहा विधानसभा क्षेत्रात ३३० मतदान बूथ आहेत.त्या वरील मतदारांना घरोघरी जाऊन मतदार वोटर स्लिप “बीएलओ यांनी वाटप केले आहेत .कोणीही मतदार वंचित राहू नये याची बीएलओ यांनी दक्षता घेतली आहे असे बीएलओ चे सुपरवायझर केंद्र मुख्याध्यापक बाबुराव फसमले यांनी सांगितले
●झोनल ऑफिसर याची बैठक
————————-
मतदान ७ मे रोजी होत असून त्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी झोनलं ऑफिसर याची बैठक घेतली यात त्यांनी महत्वाच्या सूचना दिल्या .समस्यांचे निराकरण केले .कोणतीही अडचण आल्यास संपर्क साधावा असे सांगितले .तहसीलदार परळीकर कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे समन्वयक मन्मथ थोटे यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.