हदगाव शहरात गेल्या 20 वर्षापासून अनेक वार्डात नागरी सुविधा नाही
हदगाव, शेख चादपाशा| हदगाव शहरातील काही वार्डात गेल्या २० वर्षापासून रोड नाल्या व ४इंची प्लास्टिक पाईप ने नागरिकांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत आहे. न.पा. हदगांव मध्ये करोडो रु निधी खर्च तरी कुठे होतो असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहे.
नादेंड जिल्ह्यातील हदगाव नगरपरिषद सर्वात जुनी असुन, त्याची स्थापना १९५४ वर्षी,झालेली आहे. आता पर्यत ह्या नगरपालिकेवर विरोधक सत्ताधारी विविध काँग्रेस शिवसेना विविध राजकीय आघाडीची सत्ता उपभोगलेली असुन यातील बहुतांशी संधीसाधुनी शहराचा विकास न करता आपला व आपले चेलेचपाटे आपली मालमत्ता विविध संस्थाला जागा कशी मिळवता येईल व सस्थेला कस अर्थिक फायदा होईल याकडेच लक्ष केद्रित केले आहे. परिणामी शहराचा विकास होण्या ऐवजी भकास झालेल दिसुन येत आहे.
शहराला एकच मुख्यप्रवेश रोड बायपास सुविधा आसतांनाही अध्याप कोणत्याही नगराध्यक्ष ने यासाठी आग्रह धरलेला नाही. शहरात निजामकालीन शासकी पांदण रस्ता आहे. यावर शहरातील अनेक धनाड्या व्यक्तीनी गिळकृत केला या बाबतीत ही आता पर्यंत कोणत्या नगरसेवक नगराध्यक्षा ने किवा आमदार खासदार ने या बाबतीत काहीच केलेले नाही. कारण यामध्ये अनेकांचे अर्थिक हितसंबंध असल्याचे दिसुन येत आहे.
हदगाव शहरात विकासाची कामे झालेली आहेत ते पण ठराविक भागात तर काही भागात तर निव्वळ थातुरमातूर कामे करुन निधी गडप करण्यात आलेल आहे. विशेष म्हणजे १० वर्षापासुन जलशुद्धीकरण प्रकल्पाचे दोनदा उद्घाटन झालेले असतांना अध्याप शहरवासीयांना याचे शुद्ध पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. विशेष म्हणजे काही वर्षापुर्वीच माजी मुख्यमंत्री आशोकराव चव्हाणांच्या हस्ते या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते.
जुन्या शहरात तीन माजी नगराध्यक्ष माजी खासदर असुन ही …!
हदगाव शहरातील जुन्या शहरात तीन माजी नगराध्यक्ष व माजी खा . सुभाष वानखेडे यांचे निवास्थान आहे. त्याच भागात गेल्या २० वर्षापासुन रोड नाल्या नाहीत तर याच भागात प्रभाग क्रमांक १ मध्ये तर रोड नाही. नाल्या नसल्याने साडपाणी रोडवरच साचत असल्याने रोगराईच प्रश्न निर्माण झालेल असतांना याकडे माञ अध्याप ही दुर्लक्ष आहे. अणखी विशेष बाब अशी की, गेल्या विस वर्षापासून ४ इंची प्लास्टिक च्या पाईप मधून इथल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे हे आवर्जून उल्लेख करावा लागेल ..