नांदेड| महापालिकेतील विविध घोटाळ्याची सीआयडी आणि विभागीय आयुक्तांच्या समिती मार्फत चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उद्या सोमवारी तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत.
शहरात बोगस विकासकामे दाखवून संगणमताने करोडो रुपयांचा अपहार करून स्वतःचे घरे भरणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून कायमचे बडतर्फ करावे आणि अपहराची रक्कम संबंधिता कडून वसुल करावी या मागण्यासाठी सीटू कामगार संघटना आणि जमसं महिला संघटना आक्रमक झाली असून मागील तीन महिन्यापासून वेगवेगळी २० आंदोलने केली आहेत. २७ जुलै च्या अतिवृष्टीतील पीडिताना अद्याप देय मंजूर अनुदानाची आर्थिक मदत मिळाली नसल्याने दि.५ फेब्रुवारी रोज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर दुपारी १२ वाजता तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत.
त्या निदर्शने आंदोलनात नांदेड शहरातील पात्र पूरग्रस्तांनी सामील व्हावे असे आवाहन सीटूचे जनरल सेक्रेटरी तथा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांनी केले आहे. तसे निवेदन २ फेब्रुवारी राज्याचे मुख्य सचिव,विभागीय महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी,नांवाशमनपा आयुक्त आणि पोलीस अधीक्षक नांदेड आदींना रीतसर दिले आहे. सिसिटीव्ही कॅमेरा घोटाळा,दिवाबत्ती घोटाळा गुंठेवारी आणि बांधकाम घोटाळ्या सह मनपात विविध विभागात अनेक घोटाळे झाले आहेत.त्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींविरोधात कठोरात कठोर कारवाई करावी ही मागणी सातत्याने केली जात असून दि.५ फेब्रुवारी रोज सोमवारी सीटूच्या आंदोलनास शंभर दिवस पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत.
ज्या ज्या पूरग्रस्तांचे नाव पात्र यादीत आले आहे परंतु त्यांना अजून पैसे मिळाले नाहीत अशा सर्वांनी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी येथे उपस्थित रहावे असे आवाहन सीटू कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.त्या सर्व पात्र पूरग्रस्तांची नावे,आधारकार्ड आणि अपडेट बँक पासबुक पुन्हा सादर करून आपले मंजूर अनुदान तात्काळ मिळवून घ्यायचे आहे.तरी येताना सोबत वरील कागजपत्रे सोबत ठेवावीत कारण मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांना प्रत्यक्षात भेटून मंजूर अनुदान मिळवून घ्यायचे आहे.अशा सूचना संघटनेच्या वतीने देण्यात आल्या आहेत. अशी माहिती सीटू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.