नांदेडमहाराष्ट्र

हौशी छायाचित्रकारांसाठी “क्लिक नांदेड” छायाचित्र स्पर्धा; महासंस्कृती महोत्सवानिमित्त आयोजन

नांदेड| “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा” च्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान व्हावे या उद्देशाने दिनांक 16 ते 18 फेब्रुवारी 2024 या कालावधीत “महासंस्कृती महोत्सवाचे” आयोजन करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून महोत्सवाचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील विविध जैवविविधता, पर्यटनस्थळ, पशु-पक्षी, वनसंपदा, धबधबे, नदी, शिल्प, ऐतिहासिक स्थळे आदी विषयांना प्रतिबिंबीत करणारे “क्लिक नांदेड” छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

छायाचित्र स्पर्धेत पुढील विषय देण्यात येत आहेत. यात निसर्ग, पशु-पक्षी, शिक्षण, कला, स्थापत्य, जीवनशैली, खेळ, पर्यटन, खाद्यसंस्कृती, जैवविविधता, परंपरा, संस्कृतीवरील छायाचित्रांचा समावेश असावा. हे छायाचित्र जानेवारी 2023 ते दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत काढलेले छायाचित्र असावेत. यासाठी पुढील नियमावली, अटी ठेवण्यात आल्या आहेत.

छायाचित्र नांदेड जिल्ह्यातीलच असावीत. प्रती छायाचित्र (IMAGE) जास्तीत जास्त 10 एमबी व कमीत कमी 03 एमबी ची छायाचित्रे ग्राह्य धरल्या जातील. स्पर्धकाने आपली छायाचित्रे clicknanded@gmail.com या ईमेलवर पाठवावीत. प्रत्येक छायाचित्रासोबत दोन ते तीन वाक्यात छायाचित्राबाबत मराठी भाषेत माहिती युनिकोड फॉन्टवर टाईप करुन पाठवावी. एका छायाचित्रकाराला स्पर्धेत दिलेल्या विषयासाठी एकुण 10 छायाचित्र देता येतील. आयोजकांतर्फे मुळ थीमशी जुळणारी त्यांची मूळ डिजिटल छायाचित्रे मागणी केली गेल्यास, स्पर्धकास ती सादर करावी लागतील.

स्पर्धेत जानेवारी 2023 ते फोटो स्पर्धा सामिल होण्याच्या अंतिम तारखे पर्यंत काढलेली छायाचित्रच ग्राह्य धरल्या जातील. ब्लर झालेली छायाचित्रे ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. DSLR आणि Mobil फोटोग्राफी या दोन्ही फॉर्ममध्ये स्पर्धक भाग घेऊ शकतात. ड्रोन द्वारे काढलेली छायाचित्र स्वीकारली जाणार नाही. छायाचित्र उच्च-रिझोल्यूशनचे जेपीजी JPEG किंवा पीएनजी PNG मध्ये असने आवश्यक आहे. फोटोवर कोणत्या प्रकारचा लोगो, वॉटर मार्क, कॉपीराईटमार्क,ओळखीचे चिन्ह, अथवा कोणतीही अन्य दृष्य स्वरुपाची बाब टाकता येणार नाही.

रंग, कॉन्ट्रास्ट, ब्राइटनेस ऍडजस्टमेंट आणि फोटो (चे) क्रॉप करणे यासह मूलभूत संपादन स्वीकार्य आहे, परंतु असे कोणतेही संपादन फोटोच्या सत्यतेवर आणि/किंवा वास्तविकतेवर परिणाम करत नाही. स्पर्धा सर्व वयोगटातील सर्व फोटोग्राफी प्रेमींसाठी खुली आहे. जिल्हा प्रशासन नांदेड यांना स्पर्धा आणि त्याच्या थिमशी सादर केलेली छायाचित्रे भविष्यात संबंधित प्रचारात्मक हेतूंसाठी वापरण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा अधिकार असेल. त्याबाबत भविष्यात कुठलीही आर्थिक अथवा मानधन स्वरुपाची मागणी, स्पर्धकास करता येणार नाही.

छायाचित्रकार आणि कलाकारांचे तज्ञ पॅनेल सर्जनशीलता, तांत्रिक गुणवत्ता, रचना आणि थिमसह संरेखन यावर आधारित निवड करेल. निवड झालेल्या विजेत्यांना थेट जिल्हा प्रशासनाकडून निवडी बाबतकळविले जाईल. सर्व विषयातून प्रत्येकी एका विजेत्यांना जिल्हा प्रशासनाकडून गौरविण्यात येईल. स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे. अयोग्य वाटली जाणारी किंवा नमूद केलेल्या स्पर्धेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या कोणत्याही प्रवेशास अपात्र ठरवण्याचा अधिकार आयोजकांनी राखून ठेवला आहे. स्पर्धक वय वर्षे 18 खालील असल्यास वरील अर्जावर पालकांची स्वाक्षरी त्यांचा आधार कार्ड नंबर सह नोंदविणे क्रमप्राप्त आहे. छायाचित्राचा मुळ हक्क हा छायाचित्र स्पर्धकाचा असून, संबंधीतछायाचित्र इतरत्र वापरण्याची मुभा छायाचित्रकारास असेल. छायाचित्रे पाठवण्याची अंतिम मुदत 12 फेब्रुवारी 2024 असेल. परिक्षेच्या निकालाबाबत सर्व अधिकार निवड समिती व जिल्हा प्रशासनाकडे राखीव राहतील. सर्व सहभागी छायाचित्र स्पर्धकांना सहभागाचे ई-प्रमाणपत्र प्राप्त होईल.

छायाचित्र स्पर्धेतील निकाल अंतीम करण्याचे / नाकारण्याचे सर्व हक्क आयोजन समितीचे राहतील. स्पर्धेचा विहित नमुन्यातील अर्ज नांदेड जिल्हाचे https://nanded.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात हौशी छायाचित्रकारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

निवड झालेल्या 100 छायाचित्रांचा समावेश प्रशासनामार्फत आयोजीत प्रदर्शन कालावधीत महासंस्‍कृती महोत्‍सवात लावण्यात येणाऱ्या प्रदर्शनीमध्ये करण्यात येईल. महोत्सव प्रदर्शनी पश्चात निवडक 100 छायाचित्रे विविध कार्यालयात प्रदर्शनी भागात लावण्यात येतील. निवड झालेल्या 100 छायाचित्रांना गौरविण्यात येईल व त्यामधील सर्वोत्कृष्ट छायाचित्रांना विविध पारितोषिके देण्यात येतील.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!