
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमीनीसह येलो मोझ्याक अळीमुळे सोयाबीन पिकांच्या नुकसानीची शेतकर्यांना तात्काळ भरपाई मिळवून द्यावी,अशी मागणी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी शेतकरी मेळावा व सन्मान सोहळ्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. आ. रातोळीकरांनी अनुदानाबाबत अत्यंत मुद्देसुद मांडणी करून शेतकर्यांच्या व्यथा शासनाच्या निदर्शनास आणून दिल्याने उपस्थितांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
नियोजन भवनात रविवारी महूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित शेतकरी मेळावा व सन्मान सोहळ्यात आ. राम पाटील रातोळीकर यांनी शेतकरी व शेतीविषयक अभ्यासपूर्ण अनेक मुद्दे उपस्थित करून महसूल मंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. पुढे बोलताना आ. रातोळीकर म्हणाले, जून-जुलै 2023 मध्ये शेतीपिकांच्या व शेत जमिनीच्या झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने नुकतेच जिल्हानिहाय अर्थसाह्य वितरीत केले आहे. नांदेड जिल्ह्
