माथा ठिकाणावर ठेवायचा असेल तर गाथा अन सुंदर जीवन जगायचे असेल तर ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे- ह.भ.प.वटंबे महाराज
भोकर। पवना येथील श्री रामकथा ज्ञानयज्ञ सोहळा,ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरीनाम सप्ताहातील कीर्तनरुपी सेवेत प्रख्यात भगवताचार्य,रामायणाचार्य, ह.भ.प. शिवाजी महाराज वटंबे यांनी सध्याच्या परिस्थितीस अनुरूप बिघडणाऱ्या तरुणाईला उपदेशपर निवेडलेल्या संतश्रेष्ठ, शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांचा अभंग आवडीने भावे हरीनाम घेसी तुझी चिंता त्यास सर्व आहें.यातून भरकटत चाललेली युवा पिढी यांचे माथे ठिकानावर आणण्यासाठी गाथा तर सुंदर जीवन जगण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचण्याचा मौलाचा सल्लारुपी उपदेश यावेळी केला.
वरील हरिकीर्तनात अभंगाचे निरूपण करताना महाराजांनी समाजाला उपदेश रुपी डोस पाजले विशेषतः युवा पिढीला अधिक लक्ष करून कीर्तन समजावले. संतती, संपती, गुरु ह्या चांगल्या मिळणे दुर्लभ असतातच तर माणसाचं जन्म त्याऊनही दुर्मिळ त्र्यांशी लक्ष नव्यान्नाव हजार नऊशे नव्यान्नाव जन्मानंतर मानव जन्म मिळतो व तो सरळ असतो तर बाकी ज्या योनी आहेत त्या आडव्या असतात पण ते कधीच एकमेकांना आडव्या येत नसतात अशी मिस्किल टीका करून आजकाल समाजात चालेल्या घटनेवरून समजावले. पुढे महाराज म्हणाले तरुणाने ठरविले तर काहीही करू शकतो ध्येय निश्चित करून देवावर श्रद्धा ठेवा व श्रम करा उद्याचा दिवस तुमचाच असेल. यव्हाना संत, महात्मा, चोर, डाकू काहीही होऊ शकता.
कुठल्याच परिस्थितीत हार मानू नका खचले नाही पाहिजे यश तुमचेच आहें. बालपण खेळण्यात, तरुणपण कोणाचंच ऐकायचं नाही तर म्हातारपणात सर्व अंग क्षीण झालेलं असते त्यावेळी भक्ती करणे योग्य नाही सर्व वेळ निघून गेलेली असते. पण एकदा चाळीशी ओलांडली की समजदारी येते म्हणून तरुणपणात गळ्यात तुळशीची माळ घालून परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. पायी दिंडी वारी केली पाहिजे. अलीकडे एखादा थोडा श्रीमंत झाला की भक्ती, देवधर्म विसरतो पण माझ्या छत्रपती शिवारायांना कधीच राजे असून देखील गर्व झाला नाही ते नेहमी जगद्गुरू तुकोबारायांच्या कीर्तनाला जमिनीवर मांडी घालून बसून हजेरी लावायचे. आजच्या पिढीने त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे असे मतही व्यक्त केलं. ज्ञानेश्वरी, गाथा जर वाचली तर भरकटत चाललेली तरुणाईचे माथे ठिकाणावर येतील असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
देशातील सर्व जाती, धर्म, पंताच्या मावळ्यांना एकत्र करून शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असंख्य शहिदांच्या, हौतात्म्याने ,रक्ताने लाल झालेली ही मराठमोळी माती असून स्वर्गातून माझे राजे शिवराय , छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी या साठी धर्मासाठी स्वराज्यासाठी सतत चाळीसदिवस अत्यंत अनन्य छेळ, हाल अपेष्ठा सहन करूनशेवटी आपला देह ठेवला परंतु स्वर्गातून पाहून म्हणत असतील हेच का माझे स्वराज्य ज्यात तरुणाई झिंगते आहें व्यसनानी बुडून निघालेत याच साठी आम्ही सर्व सहन करून स्वराज्य निर्माण केलं होत का?आपले अनमोल जीवन दारू, गांजा, आफू,चरस, आदींच्या नादी लागून वाया घालवत आहेत.तरुणांहो छत्रपती साठी जरी नीट नाही वागले तरी तुमच्या मायबापा साठी, लेकरा बाळासाठी, बायकोसाठी तरी चांगले जगा असा सबुरीचा सल्लाही महाराजांनी दिला. हे कीर्तन फक्त तरुणासाठी आहें कारण आपला देश तरुणांनाचा देश आहें तरुण देशाचा कणा आहें म्हणून शंभर टक्के विश्वास ठेवून तरुणांनी गळ्यात तुळशी माळ घालून भजन, कीर्तन करीत श्रद्धा ठेवून आपले जीवन व्यथित करा माऊली तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही अशी हमी दिली. भाव धरुनीया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावारी.
एखादा महाराज, मोठी व्यक्ती आपल्याकडे आली की आजची तरुणाई सेल्फीसाठी धडपडते त्यापेक्षा पण तरुणांनी लोक आपल्या सोबत येऊन सेल्फी काढण्यासाठी उतावीळ झाले पाहिजे असे कार्य करावे. प्रपंच आसो की परमार्थ त्यात विश्वास अतिशय महत्वाचा असतो हे ठणकावून सांगितले. वैज्ञानिक युगात जीवन जागणारे लोक देव नावाची वस्तू मानत नाहीत म्हणुन त्यांच्यासाठी मी म्हणेन की उदरात असताना बाळाला कोण जगवितो तर जन्मानंतर बाळाची समप्रणात भूक भगिविण्यासाठी दूध कोण तयार करतो? असा प्रतिप्रश्न ही महाराजांनी येथे उदाहरणादाखल उपस्थित केला.
आजवर ज्यांनी ज्यांनी देवावर विश्वास ठेवला त्यांच्या विश्वासास भगवंताने तडा जाऊ दिला नाही यासाठी महाभारतातील द्रो पदीला तिची अब्रू राखणण्यासाठी साड्या पूर्वील्याचे सुंदर उदाहरणं दिलं. तर जीवनातील दुःख हे मागील जन्मीच्या कर्म आणि त्यानुसार ठरलेल्या प्रारब्ध यावर अवलंबुन असते यासाठी खुद्द ज्ञानेश्वर माऊली यांच जीवन चरित्रच हुबेहून कथन करून श्रोत्यांच्या नयनातुन अश्रुना वाट फोडली. तर बाप काय असतो यासाठी ज्याचा बाप गेला त्याला विचारा असे महाराजांनी सांगितले. तरुणांनी ध्येय निश्चित केलं करून त्यास अनुसरून व कर्म केलं पाहिजे तरंच यश मिळते. आहें त्या परिस्थितीत आनंद शोधा असा सल्लाही यावर बोलताना दिला.
तर कीर्तनाच्या उत्तरार्धात बोलताना महाराज म्हणाले मुखात हरीनाम व सांगत चांगली असली की त्याचे प्रारब्ध ही देव बदलतो ते एका सुंदर श्रीकृष्ण भजनातून सांगितलं. चले श्यामसुंदर मिलने सुदामा जाते जाते मुख में हरेकृष्ण रामा सुदामा जेंव्हा श्री कृष्णाला भेटायला गेला तेंव्हा कृष्णाने सुदाम्याच्या कपाळावर पहिले तर सात जन्म दारिद्र लिहलेलं होत पण साक्षात देव म्हटल्यावर काय क्षणात सुदामा नागरी भगवान श्रीकृष्णाने सोन्याची करून दरिद्र मुक्त केलं. म्हणून भक्ती ही फार महत्वाची असून ती प्रत्येकाने केली पाहिजे असे सांगितलं तर शेवटी मेरी झोपडी के भाग आज खुलं जायेंगे राम आयेंगे या भक्ती गीताने आवघी पवना नागरी दुमदुमली.
कीर्तन श्रवन करण्यासाठी परिसरातील पोटा बु.येथील पत्रकार गंगाधर पडवळे यांच्या सह नागोराव मेंढेवाड,ता. अध्यक्ष अध्यात्मिक आघाडी, आम्ही वारकरी परिवार, डॉ.सूर्यकांत माने यांच्या सह पवना, अंदेगाव,दिघी, भिश्याचीवाडी, दरेसरसम,आदी गावातील भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते. तर या सेवेत संगीत साथी मध्ये मृदूंग सुरज माने बोरीकर, गायनाचार्य ज्ञानेश्वर माऊली शिबदरेकर, दत्ता माऊली नलावडे,तर मार्गदर्शक बाबू महाराज अंदेगावकर ह्यांची विशेष उपस्थिती होती.