
हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालया मध्ये डॉ. ए. पी .जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन सजरा करण्यात आला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर कार्यकमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल बोंबले राजू यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. उज्वला सदावर्त मॅडम म्हणून लाभल्या तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे नॅक समन्वयक डॉ.गजानन दगडे हे लाभले.तर प्रमुख अतिथी म्हणून गणित विभागाचे डॉ. सय्यद जलील सर हे होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला दगडे सरानी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावरती प्रकाश टाकला त्यांच्या ग्रंथ संपदा विषयी तसेच त्यांच्या साहित्या विषयी अनमोल असे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे दरवर्षी 15 ऑक्टोंबर या दिवशी वाचन प्रेरणा दिवस भारतात केला जातोअसे प्रतिपादन केले.
त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे ग्रंथपाल बोंबले राजू यांनी वाचन संस्कृती कशा प्रकारे वाढली पाहिजे या विषयी मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे ग्रंथालया मध्ये वाचक जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आला पाहिजे असे सांगितले. आजच्या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. संगपाल इंगळे सर यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयातील कार्यालयीन कर्मचारी कोल्हेवाड सर यानी केले. तसेच कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. (कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय विभागाद्वारे करण्यात आले .)
