नवीन नांदेड। नांदेड जिल्हा पोलीस दलातील ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हेड कान्सटेबल विक्रम बालाजी वाकडे यांना महाराष्ट्र राज्य पोलीस विभागातील विविध क्षेत्रात उत्तम व उल्लेखनिय कार्य बदल पोलीस महासंचालक यांच्ये सन्मान चिन्ह जाहीर झाल्याबद्दल १ मे रोजी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नांदेड परिक्षेत्र महासंचालक,जिल्लाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सध्या ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोहेका विक्रम बालाजीराव वाकडे हे नांदेड ३२वर्ष सेवा बजावली असुन उलेखनीय कामगिरी मध्ये, जवळपास २२५ पुरस्कार मिळाले असून नांदेड येथील ऊघोजक बियाणी गोळीबार हत्या प्रकरणात तपास पथकात राहुन या घटनेतील आरोपी निष्पण करण्यात महत्वाची भूमिका बजावुण आरोपी अटक करण्यात यश मिळवले तर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा येथे व शिवाजी नगर,ईतवारा,ग्रामीण पोलीस स्टेशन येथे असतांना अनेक गुन्हे शोध पथकात विविध चोरी व घटनेचा तपास लावून मुदेमालासह आरोपी अटक करण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यांच्या ऊलेखनिय कामगिरी दखल घेऊन महाराष्ट्र पोलीस विभाग यांच्या वतीने व नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने केलेल्या शिफारशी वरून हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
१ मे20२४ रोजी पुरस्कार हा नांदेड जिल्हा पुरस्कार नांदेड परिक्षेत्र महासंचालक, जिल्हाधिकारी,नांदेड, जिल्हा पोलीसअधीक्षक,ऊप विभागीय पोलीस अधिकारी,यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक,ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे यांच्या सह ग्रामीण पोलीस स्टेशन येथील अधिकारी व पोलीस कर्मचारी ,महिला पोलीस कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.