भोकर| येथील रयत संवाद न्युज चे नांदेड जिल्हा प्रतिनिधी हमीद पठान यांना स्मृतीशेष गुरुवर्य एम.पी.भवरे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड, बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र (सांस्कृतिक विभाग) व पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्मृतीशेष गुरुवर्य एम.पी.भवरे कामारीकर यांच्या स्मृती दिनी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा व लोकपारंपारिक कलावंत शाहीर मेळाव्यात दि.१९ जानेवारी रोजी मौजे पोटा (बु.)येथे यांच्या वतीने “पत्र भुषण”पत्रकारीता पुरस्कार प्रदान हमीद पठान यांना करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी एस.जी.माळोदे यांच्या हस्ते पत्रकार हमीद पठान यांना शुक्रवारी राज्यस्तरीय “पत्रभुषण ” पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, यावेळी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते स्मृतीशेष गुरुवर्य एम.पी.भवरे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड, बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र (सांस्कृतिक विभाग) व पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दि.१९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १ वाजता पोटा येथे आयोजित करण्यात आला होता पुरस्काराचे हे २१ वे वर्ष होते कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ कलावंत दत्ता गडलवार हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती शांताबाई निवृत्तीराव पाटील जवळगांवकर,जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी एस.जी.माळोदे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उदघाटन करण्यांत आले.
व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून बाबाखॉन ,श्रीमती सुमनबाई भवरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुदेश मांजरमकर, संपादक जयभीम पाटील ,जिल्हास्तरीय मान्यवर वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन निवड समितीचे सदस्य, कार्यकारी अभियंता मिलींद गायकवाड, कार्यकारी अभियंता अशोक भोजराज, डॉ. विलास ढवळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, हिमायतनगर बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाड, गंगाधर वाघमारे, कानबा पोपलवार, पत्रकार रमेश गंगासागरे, सुरेश कावळे, डॉ कैलास कानिंदे, मनोज शिंदे, ज्ञानेश्वर पंदिलवाड यांच्यासह व्यासपीठावर मेळाव्याचे स्वागताध्यक्ष कैलास माने पोटेकर, शेख रफिखशेठ, संयोजक त्रिरत्नकुमार मा.भवरे, ग्रामविकास अधिकारी व्हि.जी.जकीलवाड आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थित होते पत्रकार हमीद पठान हे निःपक्ष आणि निर्भीड पत्रकार आहेत ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत रयत संवाद या न्युज चॅनल मध्ये काम करित असताना त्यांनी शैक्षणिक, सामाजिक,आणि सांस्कृतिक कामात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो त्यांना राज्यस्तरीय”पत्रभुषण” पुरस्कारामुळे हमीद पठाणच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरांतून हमीद पठाण चे अभिनंदन व कौतुक होत आहे या सोहळ्याचे सुत्रसंचलन प्रा.उत्तम कानिंदे व लक्ष्मणराव भवरे यांनी केले तर, उपस्थितांचे आभार स्वागताध्यक्ष कैलास माने पोटेकर यांनी मानले.