हदगाव उपजिल्हा रुग्णालया सेवा विस्कळीत काही तरी पर्यायी व्यवस्था करा – एआयएम तालुका अध्यक्ष शेअहेमद
हदगाव, शे.चांदपाशा| शहराच्या उपजिल्हा रुग्णालय मध्ये कञांटी आरोग्य कर्मचा-याच्या संपामुळे आरोग्य विषयक विविधसेवा ठप्प झाल्या आहेत. या बाबतीत प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी एआयएमआयएमचे तालुका अध्यक्ष शे अहेमद चाऊस यांनी निवेदन देऊन राज्याचे आरोग्य मंञी यांचे कडे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 7नोव्हेबर 2023 पासुन आरोग्य कञाटी कर्मचारी आपल्या विविध मागण्या करिता संपावर असुन, या संपामुळे तोकड्य यंञणेवर सुरु असलेल्या कामामुळे ही सेवा प्रभावित झालेली आहे. उपजिल्हारुग्णालय मध्ये हे तालुक्यातील,प्रमुख शासकीय उपजिल्हारुग्णालय असुन तालुका व्यतरिक्त अन्य भागातील रुग्ण या रुग्णालय मध्ये येत आहे. या उपजिल्हा रुग्णालय मध्ये आरोग्य वर्धिनीसेवा आभाकार्ड काढणे बंद आहे.
जननी सुरक्षा योजना प्रधानमंञी मातृत्व वंदन योजनाआयुष्यमान भवउपक्रम हे लांबणीवर विविध आजारांचे सर्वक्षण क्षय रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधाचे वितरण बंद आहे. अती दुर्गम भागातील रुग्ण येत आहे. विशेष म्हणजे गर्भवाती महीलांचा ही फारच कुंचबना होतांना दिसुन येत आहे. जर पर्यायी व्यवस्था न केल्यास सनदी मार्गानं आम्हांला आदोलन करावे लागेल असा इशारा ही निवेदनात देण्यात आलेल आहे.
ताण वाढत आहे /वैधकीय आधिक्षक डाँ स्वामी
उपजिल्हारुग्णालय मध्ये कंञाटी कर्मचारी वैधकीय आधिकारी परिचारिका औषध निर्माण अधिकारी असुन, ते संपावर असल्याने कायमस्वरुपी केवळ 4 आरोग्य कर्मचारी आसल्याने कामाचा व्याप वाढला. यामुळे ताण येत असल्याचे माहीती वैधकीय आधिक्षक डाँ स्वामी यांनी सागितले.