श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यातील मौजे गुंडवळ आणि गुंडवळ तांडा या गावातील जलजीवन च्या कामासाठी रस्ते खोदून ठेवल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले असून गावात रात्रीला पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरत आहे.

त्यामुळे नागरिक रात्री बे रात्री येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, अनेक किरकोळ अपघात होऊन नागरिक जखमी होण्याचे प्रकार घडत असल्याने संबंधितांनी कामचुकार पणा करणारे ग्रामसेवकावर कारवाई करून तत्काळ रस्ते सुधारणा करत पथदिवे बसवावे, अशी मागणी येथील भाजपाचे अनुसूचित जमातीचे तालुका उपाध्यक्ष गजानन किसन कऱ्हाळे यांनी निवेदनाद्वारे कटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

गुंडवळ ग्रामपंचायत अंतर्गत गुंडवळ गाव व तांडा येथे सर्वत्र घाणीचे सम्राज्य पसरले असून स्वच्छतेकडे ग्राम विकास अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे पावसाळा सुरु झाला असून गेल्या आठदिवसापासून सतत पाऊस सुरु आहे. त्यामुळे घाणीमध्ये संसर्गजन्य किटाणू वाढले असल्याने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

निवेदनाची तातडीने दखल घेऊन ग्रामपंचायत गुंडवळ अंतर्गत मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याने ग्राम स्वच्छता करून रस्त्यांची दुरुस्ती करत नागरिकांना मुलभूत सेवा पुरवावी व सदर गंभीर बाबीत हलगर्जीपणा करणाऱ्या ग्राम विकास अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात अशी मागणी निवेदनाद्वारे गजानन कराळे यांनी केली आहे.
