11 दिवसीय योग शिबिरास उत्तम प्रतिसाद
नांदेड| आनंद सागर सोसायटी हडको नांदेड येथील श्री बालाजी मंदिर देवस्थानाच्या भव्य पटांगणावरती दिनांक 10 डिसेंबर पासून पतंजली योगपीठ परिवारातर्फे निशुल्क योग शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
आज शिबिराचा चौथा दिवस असून, हे शिबिर 20 डिसेंबर पर्यंत सकाळी 5.30 ते 7.00 दरम्यान चालणार आहे. अनिल अमृतवार हे या शिबिरास मार्गदर्शन करत असून प्राणायाम, आसन, सूक्ष्म व्यायाम, योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार, ध्यान आदिचा सराव करून घेत आहेत, तसेच आहार व दिनचर्या, विरुद्ध आहार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केल्या जात आहे. योग साधकांना दररोज औषधी वनस्पतीचे काढे, दिव्य पेय, फळाचा ज्यूस, अंकुरित धान्याचे उसळ आदी देण्यात येत आहे.
आज बुधवार रोजी आदरणीय श्री किशनराव भवर व सोपानराव काळे यांनी कठीण आसनांचा सराव तसेच जलनेती सत्रनेती चा सराव करून दाखवले व साधकाकडून करून घेतले. राम रंगनानी यांनी भक्ती गीत प्रस्तुती केले. याप्रसंगी सर्वश्री अरुण दमकोंडवार, शैलेश पालदेवार, बालाजी वारकड, जगन्नाथ येईलवाड, शिवाजीराव शिंदे हळदेकर, राधाबाई येईलवाड, वंदना एलवारे, विभावरी देशमुख, बेबीताई गोपीले, भास्कर पोधाडे, संतोष बच्चेवार, अनिल कामिनवर, देविदास लाटकर, वंदना एकलारे, विलास मामीडवार, रवींद्र देशमुख, सतीश कवटिकवार, सतीश पाटील, विजय गुंडाळे, गोविंद बच्चेवार, वर्षा राठोड, श्रद्धा भारती, गंगासागर भालेराव, चंद्रकांत नागठाणे, सुरेश कल्याणकर, कांबळे सर, गोविंद बच्येवार, पांचळताई. संजय मुळे आदी साधक उपस्थित होते.