नांदेड

जुना कौठा नांदेड येथे मनोज जरांगे पाटील यांच्ये भव्य स्वागत

नवीन नांदेडl मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा
आरक्षण जनजागृती व शांतता रॅली निमित्ताने जुना कौठा नांदेड येथील रविनगर ,छावा चौक कौठा येथे मनोज जारांगे पाटील यांचा भव्यदिव्य सत्कार ८ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी कौठा जुना,कौठा नवीन ,असर्जन, धुमळवाडी, वसरणी, धनेगाव परिसरातील सकल समाज बांधव यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सायंकाळी ७ वाजता छावा चौक येथे मनोज जरांगे पाटील यांच्ये आगमन झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी मध्ये व जेसीबी चा सहायाने गुलाब पुष्प असलेल्या पाच किवटंल हार घालून स्वागत केले,यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाचे विधीवत पुजन करण्यात आले.

या सोहळ्याला विवेक पाटील,ॲड.जे.पी.पाटील,शिवाजी काळे, गजानन काळे, पंढरीनाथ काळे, कैलास शिंदे,शंकर शिंदे,ऊदय देशमुख सतिश बसवदे, विठ्ठल काकडे, माणिकराव काळे,भगवान काळे, यांच्यासह पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संयोजक माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे धनेगावकर, माजी नगरसेवक राजू गोविंदराव पाटील काळे, धनेगाव सरपंच पिंटु (गंगाधर )पाटील शिंदे यांनी केले होते.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!