श्रीराम प्राणप्रतिष्ठा निमित्ताने सिडको हडको भागात भव्य शोभा यात्रा,महा आरती, दीपोत्सव साजरा..
नवीन नांदेड| अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा मुर्ती निमित्ताने सिडको हडको परिसरातील राम मंदीर येथे कलश पुजन मिरवणूक ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजी ने तर हडको, सिडको बालाजी मंदिर सह विविध मंदीरात येथे विविध धार्मिक कार्यक्रम महापूजा महाभिषेक, होमहवन यज्ञ यासह महाआरती भजन कीर्तन अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, तर परिसरातील मुख्य रस्ता सह अनेक अंतर्गत रस्ता येथे पताका, भव्य दिव्य सजावट,रांगोळी काढली होती, विविध प्रतिष्ठानने रोषणाई ,विविध मंदिरात महाप्रसाद व कार्यक्रम आयोजित केले होते,तर नरोबा मंदीर कौठा येथे कलश पुजन मिरवणूक नरोबा येथील महाप्रसाद आरती झाल्यानंतर करण्यात आली, सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात येऊन फटाक्यांच्यी आतिषबाजी करण्यात आली.
२२ जानेवारी रोजी राम प्रतिष्ठापणा निमित्ताने सिडको येथील भगवान बालाजी मंदीर, गणपती मंदीर सिडको, काळा हनुमान मंदिर संभाजी चौक सिडको, सिध्दीविनायक गणेश मंदीर सिडको, राम मंदीर,हनुमान मंदिर होता ,दत मंदीर सिडको, नरहारी मंदीर ,यासह हडको येथील बालाजी मंदीर, साईबाबा मंदीर, विठ्ठल रुक्मिणी मंदीर हडको, दत मंदीर हडको, यासह अनेक मंदीर येथे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तर परिसरातील मुख्य रस्त्यावर महिला भगिनी यांनी आकर्षक रांगोळी व पताका लावण्यात आला, मंदीर परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला,
सिडको येथील राम मंदीर येथे सकाळी महाभिषेक, होम हवन व मंदीर परिसरात भव्य शोभा यात्रा पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी रस्त्याचा दुतर्फा आकर्षक रांगोळी व फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले, यावेळी माधव घाणेकर,प्रदिप आडसकर, राजन जोजारे, ज्ञानेश्वर संगणवार,गणेश भोस्कर,पराग पंचुभाई नितीन जळकोटे व विश्वस्त मंडळाने कार्यक्रम आयोजन केले होते, भव्य शोभायात्रा मध्ये परिसरातील नवनाथ कांबळे,माधव पाटील शिंदे, डॉ.नरेश रायेवार,किशोर देशमुख,गोविंद कवटीकवार, यांच्या सह प्रतिष्ठीत नागरिक महिला ,युवती,युवक मोठया संख्येने सहभागी होते सायंकाळी बंडा रंवदे प्रस्तुत स्वरछंद प्रतिष्ठान यांच्या वतीने संगीत गायन कार्यक्रमाचे व दीपोत्सव आयोजित करण्यात आला.
हडको येथील राम मंदीरात महा अभिषेक, महाआरती,कारसेवक यांच्या सत्कार, सोमाणी कुटुंब यांच्या कडून भगवत गीता देऊन सत्कार, महाआरती, व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, यावेळी माजी नगरसेवक ऑड.सदिप चिखलीकर, माजी नगरसेवक प्रतिनिधी संजय पाटील घोगरे, गजु कते, संतोष गुटे यांच्या सह विश्वस्त मंडळ उपस्थित होते, यावेळी महिला, युवक, युवती यांच्या सह मोठया प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते.
नरोबा मंदीर कौठा येथे पुजारी व्यंकटेश मुळी गुरू यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक, हनुमान चालीसा पठाण, कलश मिरवणूक, महाप्रसादाचे वाटप सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला. खुपसरवाडी, तिन शिव हनुमान मंदिर धनेगाव,साई पारक असरजन, म्हाडा कॉलनी कौठा, बालाजी मंदीर विकास नगर कौठा, धनेगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रम व मिरवणूक काढण्यात आली तर ग्रामीण भागातील गावातील मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रम, महाभिषेक, महाआरती, महाप्रसादाचे वाटप व सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला, ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.