श्रीक्षेत्र माहूर। माहूर शहरासह तालुक्यातील दहा हजारावर घरकुलधारकांना अद्याप शासनाच्या धोरणानुसार पाच ब्रास मोफत वाळू मिळालेली नाही तसेच फेब्रुवारी महिन्यात टाकलेल्या पहिल्या हप्त्यानंतर दुसरा हप्त्याची रक्कमही देण्यात आली नसल्याने दहा हजारावर गोरगरीब घरकुल लाभार्थी अद्यापही उघड्यावरच असल्याने लाभार्थ्यांना वाळू सह दुसऱ्या हप्त्याची रक्कम तात्काळ द्यावी अन्यथा उबाठा शिवसेनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उबाठा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबा दादा खराटे यांच्या मार्गदर्शनाखालीउबाठा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा पंचायत समितीचे माजी सभापती उमेश जाधव यांनी गटविकास अधिकारी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या स्वप्नाला प्रत्यक्षात खरे उतरवण्यासाठी माहूर शहरासह तालुक्यात दहा हजारावर घरकुलांना मंजुरी देण्यात येऊन पहिला हप्ता फेब्रुवारी महिन्यात टाकण्यात आला होता त्यानंतर या घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू घरपोच देण्याची घोषणाही करण्यात आली होती या घोषणा अंतर्गत गेल्या महिन्यात दि 7 ते 9 या दोन दिवसात साडेतीनशे घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी एक बरास वाळू पाच हजार रुपये दराने वाळू तस्करांच्या हाताने देण्यात आली.

परंतु ती वाळू गाळवट असल्याने आजही तालुक्यात ठीक ठिकाणी वाळूचे ढग जशास तसेच पडून असल्याने जवळपास सर्वच घरकुलाचे बांधकाम अर्धवट स्थितीत रेंगाळलेले आहे वाळूही नाही पैसाही नाही बेसमेंट करण्यासाठी सिमेंट गज व इतर साहित्य उधारीवर घेतलेले असल्याने तसेच शेतातील पेरण्यांचाच्या खर्चाच्या हिशोबाची जोड लावली असता प्रत्येक घरकुल लाभार्थी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे.

त्यामुळे घरकुल लाभार्थ्याकडून नैराशेपोटी टोकाचे पाऊल उचलत जीवाचे बरे वाईट करून घेण्याआधी नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर गंगासागर हरिभाऊ टाकरस यांचे सह मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी तात्काळ घरकुल लाभार्थ्यांचे उर्वरित हप्ते टाकून पाच बरास मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी अन्यथा उबाठा शिवसेनेकडून पंचायत समिती कार्यालय आणि नगरपंचायत कार्यालयावर आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा उबाठा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उमेश जाधव यांनी दिला आहे.
