संभाजीनगर। नांदेडच्या किनवट तालुक्यातील दलित भगिनींचा निर्घुण खून करणाऱ्या जिहाद्यांना कठोर शासन करण्यात यावे अशी संभाजीनगर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात दिनांक 29 मे रोजी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , गृहमंत्री यांना प्रशासनाच्या वा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल , दुर्गा वाहिनी मातृ शक्ती इत्यादी संघटना आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी निवेदन देणार असल्याचे माहिती वर्तमान पत्रासाठी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.
प्रसिद्धी पत्रकानुसार मारेगाव ता. किनवट जि. नांदेड येथील तीन हिंदू दलित मुलींचा निर्घुण खून करून दिनांक 27 5 2024 रोजी वैनगंगा नदीच्या नाल्यामध्ये फेकण्यात आले. स्वाती देविदास कांबळे वय 12 पुष्पा देविदास कांबळे वय 16 ममता सुरेश विविधकर वय 19 या तीन मुलींचा पाण्यामध्ये ढकलून शेख जावेद शेख इब्राहिम रा. सायफळ ता. माहूर व त्याचे दोन साथीदार. यापैकी एक जण हैदराबाद येथील दलाल आहे. यांनी निर्घुण खून केला मुख्य आरोपी शेख जावेद शेख इब्राहिम याने त्यांच्या मित्रासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी मृत ममता, स्वाती व पूजा यांच्यावर दबाव आणला. जेव्हा यांनी अशा बाबींना नकार दिला तेव्हा हे हत्याकांड घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
एवढेच नव्हे तर मृतांवर बलात्कार करून नंतर गुन्हा उघडकीस येईल या भीतीने तिन्ही आरोपींनी पिडीता तरुणींचा खून केला असावा अशी शंका देखील गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. तरी वरील प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल या दृष्टीने प्रयत्न व्हावा. नांदेड जिल्हा हा लव्ह जिहाद चे केंद्र बनलेला असून त्यामागे मोठे सूत्रधार आहेत अशी वदंता आहे. तेलंगणा बॉर्डर जवळ असल्यामुळे तेथून गोतस्करी मोठ्या प्रमाणात चालते तसेच हिमायतनगर येथील काही मुस्लिम जीहादी गुटख्याचा सुद्धा व्यापार करतात. त्यामुळे यामध्ये प्रचंड पैशाची उलाढाल होत आहे. कदाचित हिंदू मुलींचा व्यापार लव्ह जिहाद मध्ये फसवून हैदराबाद येथे केंद्र करून तेथून चालवला जातो अशी सुद्धा शंका आहे. मागील वर्षी 19 जून 2023 ला बजरंग दलाचा एक कार्यकर्त्याची हत्या तेथील या कसायांनी केली होती.
लव जिहाद्यांनी गोरक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर बरेच प्राण घातक हल्ले झालेले आहेत. या सर्व मुस्लिम जीहाद्यांचे नांदेड जिल्ह्यातील पोलिसांशी आर्थिक संबंध असल्यामुळे कुठलीही कठोर कारवाई होत नाही असे दबक्या आवाजात लोक म्हणत आहेत. त्यातूनच मानवतेला कलंकित करणारी वरील घटना घडलेली आहे अजूनही या प्रकरणात आरोपीला पकडून त्यावर कठोर कलम लावलेले नाही. तरी विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत वतीने सर्व आरोपींवर ॲट्रॉसिटी व पोस्को कायद्याअंतर्गत तसेच खुनाचे 302 कलम लावून कठोर शासन म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी करत आहे. याप्रकरणी सरकारने नांदेड जिल्ह्यासाठी एसआयटी स्थापन करून या जिल्ह्यातील विविध प्रकरणांचे सूत्रधार शोधून काढावेत अशी मागणी करत आहोत.
नांदेड जिल्ह्यातल्या गेल्या दोन वर्षातील सर्व घटनांना जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहोत. या संदर्भात दिनांक 29 मे रोजी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , गृहमंत्री यांना प्रशासनाच्या वा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल , दुर्गा वाहिनी मातृ शक्ती इत्यादी संघटना आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी निवेदन देणार आहेत.