
नांदेड। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. ६ वर्षीय चिमुकली प्रिया निरंजन शिंदे रविवारी दुपारपासून बेपत्ता होती. मुलगी सायंकाळ घरी न परतल्याने ग्रामस्थ आणि पोलिसांनी शोध घेतला, पण मुलगी मिळाली नाही. सोमवारी सकाळी चिमुकलीचा मृतदेह मुदखेड-उमरी रोडवर रस्त्याशेजारी झुडुपात विचित्र अवस्थेत मिळाला, त्यात चिमुकलीच्या डोक्यावर जबर मारहाण तसेच शरीरावर आगीचे चटके आणि गळा दोरीने दाबून हत्या करण्यात आली, ही संतापजनक व दुर्दैवी घटना आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे काळी फित लावून निषेध व्यक्त करत नांदेड जिल्हाधिकारी मार्फत गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.निवेदनामध्ये आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी व फास्टट्रॅक कोर्टद्वारे जे कोणी आरोपी असतीलत्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन देते वेळेस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष फैसल सिद्दिकी, विधानसभा अध्यक्ष अमितसिंघ सुखमणी, जिल्हा सचिव गोविंद सोनटक्के, सचिव युसुफ अन्सारी, सुमित साबळे, विजय गायकवाड, अमन चव्हाण, मंगल निलंगे, साई उबाळे, पार्थिव जवळे, निखिल गायकवाड, अजिंक्य गायकवाड, सुरेंद्रसिंग जमीनदार, सुरज कदम, अजय ठाकूर, सुरेंद्रसिंग गाडीवाले, सुरज वाघमारे, आकाश तेलंग इत्यादी उपस्थित होते. ६ वर्षाच्या चिमुकलीचे अत्याचार करून हत्या करणार्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या;राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे काळी फित लावून निषेध करण्यात आला.
