काटकळंबा येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न
उस्माननगर। राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेच्या माध्यमातून कंधार तालुक्यातील काटकळंबा येथे एकात्मिक पाणलोट विकास व हवामान बदल प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य विमा योजनेतून मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन आयकॉन मल्टीस्लेशालिटी हॉस्पीटल चे संचालक डॉ. श्री.शाहीद.एस.चांद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.माधुरी रेवणवार शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी लव्हेकर हॉस्पीटल,नांदेड चे डॉ.रोहीत राउतसर, प्रिती लोने,गंगाधर शिंदे,आयकॉन मल्टीस्लेशालिटी हॉस्पीटल नांदेड, चे डॉ.स्वप्नील इंदूरकर,डॉ.नौसिन शेख,मारोती वाकोडे, मुशरफ खान,काटकळंबा येथील वैयकिय अधिकारी डॉ.तातोडे सर तसेच जि.प.शाळेचे मुख्याध्यापक चिले सर व जय शिवराय पाणलोट समिती चे अध्याक्ष.बाबुराव बस्वदे सर,सचिव.मोहन पवार सर,बालाजी पानपटे, गोविंदराव वाकोरे, आदी उपस्थित होते.
या शिबिराचे आयोजन करून गावातील सुमारे २५० नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. या आरोग्य शिबिरात ईसीजी, ब्लड प्रेशर,स्त्रियांच्या आजारांवरील तपासणी, तसेच शरीराच्या विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या. पात्र रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. डॉ.रोहीत राउतसर, प्रिती लोने,गंगाधर शिंदे,डॉ.शाहीद एस चाँद सर डॉ.स्वप्नील इंदूरकर, डॉ.नौसिन शेख,मारोती वाकोडे,मुशरफ खान यांच्या पथकाने रुग्णांची तपासणी केली. संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेचे व्यवस्थापक गंगाधर कानगुलवार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले तर निवृत्ती जोगपेटे यांनी सुत्रसंचालन केले. आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी विजय भिसे,गंगामणी अंबे,रामदास बस्वदे आदींनी परिश्रम घेतले व ग्रामपंचायत कार्यालय काटकळंबा यांनी सहकार्य केले..