नांदेड| श्री युवा एकता दुर्गा माता नवरात्र मंडळाच्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त कैलास नगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात तब्बल 80 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग घेतला.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस साहेबराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरास उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला तब्बल 80 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे आयोजक शिवा नागरगोजे, अध्यक्ष, श्रीधर गायकवाड, विश्वाजीत साबणे, आकाश सावंत, आदित्य कांबळे, आशिष भवरे,विशाल साबणे, आकाश अंकुलवाड, यशवंत मुपडे, आकाश केंद्रे, ईश्वर केंद्रे, ऋतुराज बोगाने, गजानन जाधव पाटील, पवन कोळंनुरे, विक्की ढवळे, श्रीनिवास तमेवार,अमित नरवाडे, सोनू महाजन व कैलास नगर मित्र परिवाराने परिश्रम घेतले.