नांदेड

माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवस ऊत्साहात व विविध कार्यक्रमाने साजरा

नवीन नांदेड । नांदेड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसा निमित्त श्री बालाजी मंदिर देवस्थान आनंद सागर सोसायटी हडको येथे अभिषेक व खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे विश्वासू जिवलग मित्र बाळासाहेब मोरे काका यांच्या कुटुंब यांच्या वतीने भव्य सत्कार तर श्री बालाजी मंदिर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने व भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख यांच्या वतीने भगवान बालाजी मंदिर हडको परिसरात वृतपत्र विक्रेता, साफसफाई महिला व पुरुष कामगार व गरजु लोकांना छत्री वाटप , सतिश बसवदे, गजानन लोढे,पंजाबराव काळे पाटील यांच्या भव्य सत्कार फटाक्यांच्या आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले यावेळी शहरी भागासह ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकर्ते, नागरीक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी बाळासाहेब मोरे त्यांच्या कुटुंबाच्या वतीने येणाऱ्या सर्वांना पुरण पोळीचे जेवण ठेवण्यात आले होते. २ ऑगस्ष्ट माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सिडको हडको परिसरात विविध कार्यक्रम व अनेक ठिकाणी स्वागत व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

प्रारंभी सिडको येथील पंजाबराव काळे पाटील यांच्या कार्यालयात भव्य स्वागत व फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरात माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे स्वागत करण्यात आले तर युवा नेते सतिश बसवदे यांच्या संपर्क कार्यालय येथे भव्य स्वागत देविदास बसवदे, सतिश बसवदे व माजी लोकप्रतिनिधी संजय घोगरे, जनार्दन गुपीले,संदीप पाटील चिखलीकर,संजय इंगेवाड, उदय देशमुख,ललिता शिंदे,सिध्दार्थ गायकवाड, वैजनाथ देशमुख, नितीन वाघमारे, भि.ना.गायकवाड,अमोल येरगेवार,राजु लांडगे,दलित मित्र नारायण कौलंबीकर,गिरीधर मैड, व्यंकोबा चौडेकर,गंगाधर नंदेेवाड, यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते पस्थित होते. हडको गजानन लोढे यांच्या उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात आला, हडको येथील भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष वर्मा यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला, यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रणिताताई देवरे, जनार्दन ठाकूर, यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी संतोष वर्मा व मयुर वर्मा कुटुंबियांचा वतीने सत्कार करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संभाजी पाटील पुणेगावकर, भाजपा नांदेड दक्षिण विधानसभा अध्यक्ष बालाजी पाटील पुणेगावकर, डॉ. विजयानंद भोगं,डॉ.सचिन ऊमरेकर, श्रीराम पाटील, सरपंच सिध्दानाथ तारू, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील सावळे,श्रावण भिलवंडे,सुनिल रामदासी, डॉ. शितल भालके, ललीता शिंदे,महादेवी मठपती, विजया गोडघासे, मोहन पाटील घोगरे, यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वाढदिवसा निमित्त बालाजी मंदिर हडको येथे महा अभिषेक व महापूजा करण्यात आली,यावेळी विश्वस्त मंडळ पदाधिकारी अरूण दमकोडंवार, प्रकाशसिंग परदेशी, माणिक देशमुख,किशोर देशमुख, बाबुराव येरगेवार यांनी माजी खासदार चिखलीकर यांच्या सत्कार केला तर भाजपा नांदेड शहर जिल्हा उपाध्यक्ष वैजनाथ भाऊ देशमुख यांच्या वतीने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वृतपत्र विक्रेता,सफाई महिला कामगार, व गरजु लोकांना छत्रीचे वाटप केले,तर बि. आर.मोरे काका यांच्या वतीने उपस्थित सर्वाना पुरणपोळी जेवण आयोजित करण्यात आले होते.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!