नवीन नांदेड। सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनाथ जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कार्यालय समोर आयोजित सकल मराठा महिला दररोज ४० महिला साखळी उपोषणाला बसत असून ९ आक्टोबर रोजी माजी नगरसेविका तथा नांदेड जिल्हा दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा ललीता शिंदे,रेणुका मोरे,ज्योती शिंदे यांनी उपोषणाला बसुन पांठीबा दिला आहे.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय समोर२९ सप्टेंबर पासून साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आली असून सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे, पुनम पवार,जयश्री पावडे,कृष्णा मंगनाळे, भारती मडवाई,अर्चना बोंगे, वडजकर ताई,वत्सला ताई पूयड, कमल हिवराळे,मंगला हिवराळे,मनकर्णा ताटे,मीनाक्षी मिरकुटे,सुलोचना बेल्लीकर,राणी दळवी,कल्पना चव्हाण, शुभलक्ष्मी सूर्यवंशी,स्वाती मोरे,सोनाली देशमुख,शाहीन समदानी, रझिया खान,रेखाताई मोरे,डॉ रेखाताई चव्हाण,सुनीता कल्याणकर वगैरे एकूण चाळीस महिला आणि पुरुष कार्यकर्ते या वेळी उपोषणकर्त्या डॉ ललिता शिंदे, बोकारे,प्रा.रेणुका मोरे, ज्योतीताई शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषण ठिकाणी ९ आक्टोबर रोजी एकदिवसीय साखळी ऊपोषणात सहभाग नोंदविला. हे साखळी ऊपोषण १३ आक्टोबर पर्यंत चालणार असुन रोज सकल मराठा समाजाच्या ४० महिला सहभाग घेणार आहेत.