माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांची दिवाळी निमित्ताने विविध प्रतिष्ठानानां भेट

हिमायतनगर, अनिल मादसवार| हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी आज गोवर्धन पूजेच्या मुहूर्तावर हिमायतनगर शहरातील विविध प्रतिष्ठानानां भेट देऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.
हिमायतनगर शहरात दीपावली पर्व मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला जात असून, नुकतेच शहरात श्रीराम क्लॉथ सेंटरच्या शुभरामभ नंतर शहराच्या वैभवात भर पडली आहे. त्यामुळे आता शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना नांदेड, निझामाबाद, हैदराबाद यासारख्या मोठ्या शहरात कपडे खरेदीला जाण्याची गरज पडणार नाही असे दिसून येत आहे. यापूर्वी हिमायतनगर शहराच्या कापड व्यवसायात वर्धमान मेन्स वेयर, चिद्रावार कलेक्शन, श्री साई कलेक्शन आदी दुकानांनी कपडा व्यापारात भर टाकून ग्राहकांना वेगवेगळ्या स्कीम देऊन अल्प दारात दर्जेदार ब्रॅन्डचे कपडे उपलब्ध करून देत आपल्याकडे आकर्षित केलं आहे. यामुळे हिमायतनगर शहराच्या बाजारपेठेला दूरदूरपर्यंत महत्व आले आहे.
तसेच शहरात वैद्यकीय वावयास देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, दिवसागणिक विविध व उच्चशिक्षित डॉक्टर ग्रामीण भागाकडे येत आहेत, तर फर्निचर व्यवसायातही आमूलाग्र बदल झाला असून, सुरुवातीला राजस्थान सारखे कारागीर आणून घरची व प्रतिष्ठाणची सजावट केली जायची. आता मात्र येथील आवनी फर्निचर, मिस्त्री, कार्पेंटर या गुंडेवार बंधूंची टीम राजस्थानी कारागीरापेक्षा कलाकुसरीचे आणि अल्प दारात फर्निचर बनून देत असल्याने हिमायतनगर शहरातील कलाकारांचं हुनर आता जनतेसमोर येऊ लागले आहे. आता शहरातच बहुतांश व्यवसायात हायटेक सुविधा मिळत असल्याचे अनुभव अनेकांना येऊ लागले आहे.
या सर्व कारागिरांची कला कुसर पाहून अनेक राजकीय नेत्यांसह व्यापारी वर्गातून देखील अभिनंदन केले जात आहे. दरम्यान आज हदगाव हिमायतनगर तालुक्याचे मा. आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी हिमायतनगर शहरास भेट दिली. हिमायतनगर शहरात आगमन झाल्यानंतर शहराच्या वैभवात भर पाडणारे विविध नूतन व्यवसायीकानां, डॉक्टरांना व छोट्या मोठ्या दुकानांना भेटी देऊन दीपावलीच्या शुभेच्छा देत अभिनंदन केलं आहे. यावेळी व्यापारी बंधूनी देखील मा. आ. नागेश पाटील आष्टीकर यांचा स्वागत सत्कार करून भेट दिल्याबद्दल आभार मानले आहे. यावेळी त्यांच्यासोबत शंकर पाटील पळसपूरकर, हिमायतनगरचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, विठ्ठल ठाकरे, संजय काईतवाड, प्रकाश रामदिनवार, अमोल धुमाळे आदींसह अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती.
