
नांदेड/हदगाव| अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिचा गर्भपात करणाऱ्या तामसा येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आरोपीस गुरुवारी सकाळी पोलिसांनी नांदेड येथून अटक केली आहे. आता गर्भपात करणाऱ्या त्या रुग्णालयाच्या डॉक्टरचा शोध पोलीस पथक घेत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात येणाऱ्या तामसा येथील एका खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक राजूसिंह चौव्हाण यांनी त्याच विद्यालयातील दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीवर अत्याचार करून गर्भपात केल्याची घटना घडली. गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना असल्यामुळे तामसा येथील नागरिकाने संताप व्यक्त करून तामसा कडकडीत बंद ठेऊन पोलीस स्टेशन तामसा येथे निवेदन देऊन कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली होती. सादर नराधाम मुख्याध्यापकाविरुद्ध अॅट्रॉसिटी, पोस्को, बेकायदेशीर गर्भपात करणे, बळजबरीने बलात्कार करणे, विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येताच आरोपी फरार झाला होता.
या संतापजनक घटनेची दखल पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपाधिक्षक शफकत आमना यांनी घेतली. आणि आरोपीला तातडीने पकडण्यासाठी वेगवेगळ्या पथकाची स्थापना केली. पथकातील अधिकाऱ्यांनी तपासाचे चक्र फिरवून आरोपी मुख्याध्यापक राजूसिंह चौव्हाण यास नांदेड परिसरातून २४ तासांमध्ये गुरुवारी दिनांक १३ रोजी सकाळी अटक केली आहे. सध्या तामसा पोलिसासह पथकाकडून या प्रकारांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. त्याचबरोबर बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या रुग्णालयाचा व डॉक्टरचा शोध घेणे सुरू आहे. आरोपीला हदगाव पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे. तेव्हा शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. आरोपीला आज दिनांक १४ रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
