हिमायतनगर,परमेश्वर काळे। शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करून पुन्हा स्वर्णीम भारत बनविण्याकडे वळावे यासाठी आगामी 23 जानेवारी रोजी हिमायतनगर येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या मार्गदर्शन शिबिराचा तमाम शेतकरी बांधवानी लाभ घ्यावा असे आवाहन ओम शांती केंद्राच्या वतीने सिंधू दीदी व शीतल दीदी यांनी केले. ते येथील शासकीय विश्राम गृहात दर्पण दिनानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
दि 7 जानेवारी रोजी हिमायतनगर येथील शासकीय विश्राम गृहातील हॉलमध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय वैष्णव विद्यालयाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रथम पत्रकार बांधवांचा जय श्रीराम नामाची दस्ती, पत्रक व पेढा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ओम शांती केंद्राच्या वतीने येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे यासाठी स्वर्णीम भारत की पहचान… आत्मनिर्भर किसान हा कार्यक्रम दि 23 जानेवारी रोजी आयोजित केला असल्याचे सांगण्यात आले. तसेच या कार्यक्रमात माउंट अबू राजस्थान येथील राजयोगी ब्रह्मा कुमार राजू भाईजी, उपाध्यक्ष, कृषी आणि ग्रामीण विकास विभाग, ब्रह्मा कुमारी आणि राजयोगिनी ब्रह्मा कुमारी सुनंदा बहेनजी, राष्ट्रीय समन्वयक, कृषी आणि ग्रामीण विकास विभाग, ब्रह्मा कुमारीज ह्या शाश्वत योगिक शेती संदर्भामध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे. यात शेतीच्या स्वदेशी पद्धती आणि कमी खर्चात प्रदूषणमुक्त, सकस उत्पादन आणि दर्जेदार अन्न देणार उत्पादन कसे मिळवता येईल आणि आपल्या मातृभूमीला पुन्हा खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम करून पुनरुज्जीवन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे.
या नैसर्गिक आणि प्राचीन विषमुक्त शाश्वत शेतीमुळे आपण पर्यावरण असंतुलनाच्या आणि आपल्या आरोग्यविषयक समस्येवर नक्कीच आळा घालण्यात यशस्वी होउ. हि बाब अत्यंत महत्वपूर्ण असून, यासाठी जास्तीस्त जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित होऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे सिंधू दीदी व शीतल दीदी यांच्यातर्फे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, कानबा पोपलवार, गोविंद गोडसेलवार, सोपान बोम्पिलवार, गंगाधर वाघमारे, पांडुरंग गाडगे, असद मौलाना, अनिल मादसवार, दिलीप शिंदे, वसंत राठौड़, चांदराव वानखेडे, सय्यद मनानं, देवानंद गुंडेकर, शुद्धोधन हनवते, पांडुरंग मिराशे, धम्मपाल मुनेश्वर, नागोराव शिंदे, संजय कवडे, विजय वाठोरे, अनिल भोरे, कृष्ण राठोड, मनोज पाटिल, फाहद खान, आनंदा जळपते, नागेश शिंदे, दाऊ गाडगेवाड, विष्णु जाधव, दत्ता पुपलवाड, अंगद सुरोशे, गंगाधर गायकवाड, शेख खय्यूम, धोंडोपंत बनसोडे, अनिल नाइक, लिंगोजी कदम आदींसह शहर व ग्रामीण भागातील पत्रकार बांधव मोठ्या सांख्येने उपस्थित होते.