समता विद्यालयाचे सहशिक्षक पांडुरंग इंगळे यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप
उस्माननगर, माणिक भिसे। समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर ता.कंधार येथील विद्यार्थी प्रिय ,शांत , संयमी स्वभावाचे व सर्वांचे आवडते सहशिक्षक इंग्रजी विषयाचे अध्यापक पांडुरंग बापुराव इंगळे हे नियत वयोमानानुसार ३१/१०/२०२३ रोजी अठ्ठावीस वर्षे सेवा पुर्ण करूण सेवानिवृत्त झाल्याबद्दल संस्थेच्या व शाळेतील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने सहपत्नीक सन्मनपूर्वक भावपूर्णनिरोप देन्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक तथा माजी मुख्याध्यापक शामसुंदराव जहागीरदार(गुरूजी)हे होत .तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष-पुरूषोत्तमराव देशपांडे, उपाध्यक्ष- कमलाकरराव देशपांडे, सचिव-बा.दे.कुलकर्णी, सहसचिव-तुकाराम वारकड (गुरूजी), संचालक -प्रदिप देशमुख,माजी पर्यवेक्षक- विश्वनाथ पांडागळे,उदय देशपांडे, सुरेंद्र देशपांडे, नारायण पांचाळ, मु.अ.गोविंद बोदेंवाड, पर्यवेक्षक -राजीव अंबेकर सह अन्य उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवंराच्या हस्ते सरस्वती पुजनाने कार्यक्रमाची सूरवात झाली.सौ.कोमल इंगळे श्री पांडुरंग इंगळे मुलगी स्नेहा यांना शाळे च्या वतीने संपुर्ण आहेर देवुन गौरव सत्कार करण्यात आला.या प्रसंगी शामसुंदराव जहागीर (गुरूजी), तु.शं.वारकड (गुरूजी), पांडांगळे सर,कटकमवार सर,मु.अ.गोविंद बोदेंवाड, आदींनी समयोचित आपले विचार मांडले .
पांडुरंग इंगळे गुरुजी हे मागील २७ वर्ष इंग्रजी विषयाचे अध्यापन केले. विद्यार्थ्यांना इंग्रजी व्याकरण याबद्दल अनमोल असे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर क्रीडा विषयी सुद्धा ज्ञात असल्यामुळे विद्यार्थ्यांना पीटीचे धडे दिले. दर रविवारी सकाळी एन सी सी तास घेऊन याबाबत माहिती दिली.त्यामधून अनेक विद्यार्थी सैन्यात भरती देखील झाले आहेत. स्नेहा इंगळे हीने आपले विचार व्यक्त करताना इंग्लिश मधून भाषाण करून उपस्थित मान्यवर व शिक्षकांचे आभार मानले.
पांडुरंग इंगळे यांनी सत्काराला उत्तर देताना प्रदिर्घ सेवेतील आठवणी सांगत संस्थे विषयी कृतज्ञता व्यक्त केली. शाळेतील सहशिक्षकांचे प्रेम ,जिव्हाळा आत्मियता कदापि विसरणार नाही. कार्यक्रम यशसवीते साठी बालाजी भिसे,राम पवार,मारोती गोरे,कचरू मंगल,गणेश शेकापुरे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक-राजीव अंबेकर यांनी केले ,तर सुत्रसंचल ना.नं.लोंढे यांनी केले . आणि आभार राजीव अंबेकर यांनी व्यक्त केले. यावेळी शाळेतील शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.