सहयोग सेवाभावी संस्थेच्या इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल
नवीन नांदेडl महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पदविका परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. सहयोग सेवाभावी संस्थेच्या इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलि टेक्निक),विष्णुपुरी नांदेड या महाविद्यालयाने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
महाविद्यालयातील प्रथम वर्षाची विद्यार्थिनी वैष्णवी केशवशेट्टी हिने ८८.५९ % गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला आहे तसेच महाविद्यालयाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थी अनिकेत चव्हाण (कॉम्पुटर इंजी नियरिंग- ८९.२६%), अदिती वाघमारे (सिविल इंजीनियरिंग-८७. २१ %), अमरीश मिश्रा (इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग-८७.६१ %), नूर खान (मेकॅनिकल इंजिनि अरिंग- ८३. ४९ %), मैलापुरे वरदानंद (इलेक्ट्रॉनिक्स इंजी नियरिंग-८५. ७३) गुण मिळवले आहेत.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉ.संतुकराव हंबर्डे, प्राचार्य शिवानंद बारसे, प्राचार्य डॉ. ईशान अग्रवाल,विभाग प्रमुख प्रा.नारायण डाखोरे प्रा. नम्रता चौधरी प्रा. मो. नाईक, प्रा.अन्सारी, शंकर किरकन तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ह्यांनी अभिनंदन केले आहे.