
नवीन नांदेड। नांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या शाखा सिडको यांच्या वतीने दिपावली निमित्ताने वृत्तपत्र विक्रेता यांना फराळाचे वाटप करण्यात आले.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिपावली निमित्ताने वृत्तपत्र विक्रेता यांना फराळाचे वाटप करण्यात आले व दिवाळी शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, पत्रकार तिरूपती पाटील घोगरे, दिंगाबर शिंदे, सुधाकर काकडे, गणेश डोळस यांच्या सह वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सतिश कदम, उपाध्यक्ष दिलीप ठाकूर,सचिव बालाजी सुताडे, महिला वितरक वंदना लोणे, जेष्ठ विक्रेते दौलतराव कदम, मदनसिंह चौहान, शेख सयोदीन,रामनाथ दमकोडंवार, यांच्या सह विक्रेता बांधव उपस्थित होते.

