हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात आली. सदरील कार्यक्रमाच्या मंचावर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे तसेच सहकार्यक्रमाधिकारी डॉ एल बी डोंगरे व तसेच निवडनूक साक्षरता मंडळाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रिया गतिमान होण्यासाठी निवडणुकीविषयी जनजागृती निर्माण करुन लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मंडळाच्या वतीने विविध उपक्रम महाविद्यालयात राबवण्यासाठी निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात आली.व मान्यवरांच्या हस्ते निवडणूक साक्षरता मंडळाच्या सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी भारतीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदारांचा सक्रिय सहभागाची नितांत आवश्यकता आहे.
याविषयी सविस्तर मतं डॉ एल बी डोंगरे यांनी सविस्तर मत विध्यार्थ्यां समोर मांडले. तद्नंतर सामूहिक मतदार शपथ घेण्यात आली. निवडणूक साक्षरता मंडळाचे अध्यक्ष, सचिव, सहसचिव व सदस्य पुढीलप्रमाणे आहेत. अध्यक्ष विशाल परमेश्वर तुंगेवाड (B.Sc.S.Y.), सचिव रोशन रोहिदास राठोड (B.Com.S.Y.), सहसचिव श्रुतिका पांडुरंग कदम (B.A.S.Y.), सदस्य वृषाली विलास झुकरे (B.A.S.Y.), वैष्णवी विश्वनाथ शिंदे (B.A.F.Y.), वैष्णवी कैलास सूर्यवंशी (B.A.S.Y.), शेख अदनान गनी (B.Sc.F.Y.) आदी.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे कार्यक्रमाचे आयोजन तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.