
हिमायतनगर। श्री परमेश्वर यात्रेत नुकत्याच शालेय स्पर्धा संपन्न झाले आहेत, दिनांक 15 रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी बडबड गीत स्पर्धा संपन्न झाल्या तर 16 तारखेला लहान मुलांच्या भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धा वेशभूषा स्पर्धा संपन्न झाल्या, यामध्ये शाळकरी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचे सादरीकरण परमेश्वर यात्रेतील बक्षीस जिंकली.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर रात्रीला विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये जिंकल्या विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे दिनांक 15 रोजी शुक्रवारी रात्री सात ते दहा यावेळी श्री परमेश्वर मंदिर सभागृहात शालेय विद्यार्थ्यांसाठी बडबड गीते स्पर्धा इयत्ता पहिली ते दुसरी साठी आणि इयत्ता तिसरी व चौथीसाठी अशा दोन गटात ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये एकूण 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कै. केशवरावजी चौरे यांच्या स्मरणार्थ बाळू अण्णा चौरे यांच्या तर्फे विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस प्रदान करण्यात आले तसेच मंदिर समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
बडबड गीत स्पर्धेत अ गटातून स्वरा ज्ञानेश्वर सूर्यवंशी प्रथम क्रमांक, अनुष्का नागेश बिलगेवार द्वितीय क्रमांक, राधिका बालाजी बनसोडे तृतीय क्रमांक, बडबड गीत स्पर्धेतील ब गटातून अक्षरा परमेश्वर सावंत प्रथम क्रमांक, कुमारी अनुश्री गणेश मिरजगावे द्वितीय क्रमांक आणि श्रीजया गोपीनाथ डोईफोडे हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धेचे परीक्षण एन के गांगुलवार, जयराम शिंदे यांनी केले.
दि.16 मार्च रोजी लहान मुलांसाठी भव्य फैन्सी ड्रेस स्पर्धा म्हणजेच वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये एकूण 27 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून उपस्थितांना आकर्षित केले होते. वेशभूषा स्पर्धेतून अवि महाविष्णू नाईकवाडे या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिंकले, श्लोक माधव माने याने दुसरा क्रमांक पटकावला, आलोक माधव माने या विद्यार्थ्याने उत्तेजन पर पारितोषिक मिळविले, अनुश्री गणेश मिरजगावे हिने तृतीय क्रमांक पटकाविला, श्रीजा गोपीनाथ डोईफोडे या विद्यार्थिनीला देखील उत्तेजनार्थ बक्षीस देऊन श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने गौरविण्यात आले.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी श्री किशनराव दगडूजी अष्टकर डोलारीकर ओमसाई ऑफसेट प्रिंटर्स यांच्यातर्फे प्रथम बक्षीस ठेवण्यात आले होते, तर कैलासवासी संभाजी मामजी नरवाडे यांच्या स्मरणार्थ नंदकुमार संभाजी नरवाडे यांच्यातर्फे द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि प्रोत्साहन पर असे बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. या स्पर्धांचे परीक्षणक एन के गांगुलवार, संतोष जंगम यांनी केले. यावेळी अक्कलवाड सर, वऱ्हाडे सर, एन टी सर, अडबलवाड सर, मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, लताताई मुलंगे ताई, मथुराबाई भोयर, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, राम नरवाडे, विठ्ठल ठाकरे, रामभाऊ सूर्यवंशी, संगमनोर सर, मायबा होळकर, संदीप तुपतेवार, यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद शिंदे यांनी केले.
