नांदेडमहाराष्ट्र

मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक निरीक्षक समीरकुमार ओ.जे नांदेडमध्ये दाखल

नांदेड|16 नांदेड लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणी उद्या 4 जून 2024 रोजी शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर, नांदेड येथे होणार आहे. यासाठी ८९-नायगाव, ९०-देगलूर, ९१-मुखेड या मतदारसंघासाठी समीरकुमार ओ.जे. हे नांदेड मध्ये दाखल झाले आहेत.

वरिष्ठ सनदी अधिकारी असणारे समीर कुमार यांनी दाखल होताच आज मतमोजणी केंद्रावर प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. तसेच उद्या होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. यावेळी त्याच्यासोबत जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत, अन्य निवडणूक निरीक्षक शंशाक मिश्र यांची उपस्थिती होती. शशांक मिश्र हे भोकर, नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण या विधानसभा मतदार संघासाठी निरीक्षक म्हणून काम बघतील तर समीर कुमार ओ. जे. हे नायगाव, देगलूर, मुखेड या विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून काम करणार आहेत.

मतमोजणीमुळे नांदेड शहरातील वाहतुक मार्गात बदल
लोकसभा निवडणूक 2024 ची मतमोजणी 4 जून 2024 रोजी नांदेड शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, बाबानगर, नांदेड येथे होणार आहे. मतमोजणी कालावधीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये 4 जून 2024 रोजी चे सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणी कार्यक्रम पूर्ण होईपर्यत वाहतुकीच्या मार्गात बदल करुन पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत अधिसूचना प्रसिध्द केली आहे. 4 जून 2024 रोजी वाहनांच्या वाहतूक व्यवस्थेत तात्पुरत्या स्वरुपात पुढील पर्यायी मार्गावरील वाहतुकीस वळण देऊन बदल करण्यात येत आहे.

वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग
नविन मोंढा कमान ते आयटीएम चौक (कुसूमताई सभाग्रह) कडे जाणारा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद राहील. महात्मा फुले हायस्कूल ते शंकरराव चव्हाण पुतळा (लॉ कॉलेज टि पॉईन्ट) कडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद राहील. उज्वल गॅस ऑफिस ते महादेव दाल मिलकडे येणारा रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद राहील.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
अण्णाभाऊ साठे पुतळा येथून आयटीआयकडे जाण्यासाठी नाईकचौक –आनंदनगर-वर्कशॉप ते आयटीआय वाहतुकीसाठी चालू राहील. नविन मोंढाकडे येण्यासाठी आयटीआय वर्कशॉप-आनंदनगर-नाईक चौक ते नविन मोंढा वाहतुकीसाठी चालू राहील. तरी 4 जून 2024 रोजी सकाळी 6 वा. ते मतमोजणी कार्यक्रम पूर्ण होईपर्यत वाहतुकीस अडथळा होवू नये यासाठी पर्यायी मार्गाची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!