नांदेड। महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ मधील जिल्हा शल्य चिकित्सक पदोन्नती कोट्यातून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि. १२ मार्च २०२४ रोजी शासन निर्णयान्वये ४७ वैद्यकीय अधिकारी यांना नविन पदस्थापना देण्यात आल्याने डॉ.वैशाली तांबाळे मॅडम यांनी सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर या पदाचा पदभार स्वीकारला.
या प्रसंगी शुभेच्छा देतांना डॉ हंडोळे जिल्हा हिवताप अधिकारी लातूर, सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर कार्यालयातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी लक्ष्मीकांत सोनवणे, डॉ अकोलकर, संग्राम गंगापूरकर, ठोंबरे, आरोग्य निरीक्षक सचिन कुलकर्णी, शंकर मोरे, अखिल कुलकर्णी, सहाय्यक अधिक्षक राहुल जाधव, अरुणकुमार जैरमोड, लिपिक श्रीमती ठाकूरबाई शेटकार, हिवताप संघटनेचे अजित चव्हाण लातूर, सत्यजीत टिप्रेसवार, मोहन पेंढारे, साहेबराव कदम, विठ्ठल बेलखेडे, विश्वांबर जैरमोड, किरण कुलकर्णी नांदेड, बाळासाहेब घुगे अवैद्यकीय अधिकारी धाराशिव, सुनिल गायकवाड, संजय धस, विठ्ठल सानप बीड, प्रभाकर मोरे, मधुकर हासबे आदि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.