मंडळ अधिकारी पाईकराव यांना सेवेतून बडतर्फ करा ;मंडळातील आठ गावातील नागरिकांची मागणी
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। आज घडीला पाहता माहूर महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी हे या ना त्या कारणाने चांगलेच चर्चेत येत आहे.अधीच लांजी येथील रेती डेपो मधील होत असलेला भ्रष्ठाचाराच्या अनेक तक्रारी संबंधीत विभागाच्या टेबलावर येवून पडल्या असून आता याच मंडळातील मंडळ अधिकारी पाईकराव यांना एकूण आठ गावातील नागरिकांनी बडतर्फ करण्याच्या मागणीचे निवेदन दि.२० जून रोजी माहूर तहसीलदार यांना दिले आहे.
माहूर मंडळाचे मंडळ अधिकारी पाईकराव हे माहूर येथे रूजू झाल्यापासुन मुख्यालयी हजर राहत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे व आदिवासी समाजासह इतर समाजाच्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले असुन त्यास कारणीभुत मंडळ अधिकारी पाईकराव हेच आहेत असा आरोप करीत मंडळातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेताचे खरेदी-विक्रीचे व्यवहार केले परंतु मंडळ अधिकारी फेरफार करून देत नसल्यामुळे शेतकऱ्यांना बँकेकडून पिक कर्ज मिळत नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे.ऐवढेच नव्हे तर अनेक शेतकरी फेरफार अभावी खाजगी सावकाराकडून जादा व्याजदराने कर्ज घेत असल्याने सदर कर्जाचा बोजा वाढल्यानंतर कर्ज फेडणे कठीन होत आहे व सावकाराचा सुलतानी वसुलीचा तगादा शेतकऱ्यांच्या मागे लागल्यानंतर शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. शेतकऱ्यास आत्महत्या करण्यास पाईकराव सारखे मंडळ अधिकारीच जबाबदार असतात त्यामुळे फेरफार नाकारणाऱ्या मंडळ अधिकारी पाईकराव यांची चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फे करण्याची मागणी या निवेदनातून केली गेली आहे.
तर यापुढे माहूर मंडळात फेरफार अभावी सावकारी कर्जाने शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास मंडळ अधिकारी पाईकराव यांना जवाबदार धरून यांचे विरुध्द शेतकऱ्यांच्या आत्महत्तेस कारणीभुत समजून त्यांचेविरुध्द शेतकऱ्यांचा खुन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी गेली आहे. मंडळ अधिकारी पाईकराव यांचे रेती माफीयाशी हित संबंध असून पैनगंगा नदी पात्रात माहूर मंडळाच्या हद्दीत प्रचंड वाळू उपसा झाला असुन पैनगंगा नदी पात्रात मोठमोठे खड्डे तयार झाले आहे. त्यामुळे नदीपात्रात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भिती निर्माण झाली असुन मंडळ अधिकारी पाईकराव यांच्या आर्शीवादानेच नदीपात्रातून प्रचंड वाळू उपसा झाला असल्याचा आरोप केला आहे.
मंडळ अधिकारी पाईकराव यांच्या सततच्या गैर हजरीमुळे विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान झाले असुन गृहचौकशी अहवाल न मिळाल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असल्याने या हि प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली गेली आहे.अशा गैर हजरीला लगाम लावण्यासाठी तहसिल कार्यालय माहूर येथे सर्व मंडळ अधिकारी, सर्व तलाठी व सर्व कर्मचारी यांची नियमीत उपस्थिती राहण्यासाठी तहसिल कार्यालयात बायोमॅट्रीक थम मशिन लावुन थम मारणे बंधन कारक करावे व मंडळ अधिकारी पाईकराव यांना त्वरीत निलंबीत करून चौकशी करावी व चौकशी अंती सेवेतून बडतर्फ करावे, अशा अशायाचे निवेदन एकूण आठ गावातील नागरिकांनी दिले असून सदरील निवेदनावर तक्रार धारकांच्या साक्षर्या आहेत.