आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना बडतर्फ करा
नांदेड। महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यातील आरोग्य विभाग पूर्णतः अपयशी ठरला असून निष्पाप रुग्णांचे बळी घेणाऱ्या आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना बडतर्फ करून कठोर कारवाई करावी. ही मागणी घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दि.७ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता तीव्र निदर्शने केली.
रुग्णांस आवश्यकता असणारे ओषध कधीही शासकीय दवाखान्यात उपलब्ध नसने, अपुरे मनुष्यबळ,धुळखात पडलेली यंत्र सामुग्री,घाणीचे साम्राज्य,लोकप्रतिनिधीचे सोईस्कर पद्धतीने दुर्लक्ष. यास राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार असून शकडो रुग्णांच्या मृत्यूचे प्रकरण दडपण्यासाठी त्यास जातीय स्वरूप देऊन जनतेचे लक्ष विचलित करण्यात येत आहे. असा आरोप यावेळी माकपचे सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी आपल्या भाषणात केला.
निदर्शने आंदोलनात कॉ.उज्वला पडलवार, कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड, कॉ.संतोष शिंदे, कॉ. प्रा. देविदास इंगळे, कॉ.इरवंत सूर्यकार, कॉ.दिगंबर घायाळे, कॉ.गोपीप्रसाद गायकवाड,कॉ. सोनाजी कांबळे,कॉ.मारोती आडणे, कॉ.शेख इम्रान,कॉ. राजेश दाढेल, कॉ.भाऊराव राठोड,क्रांती सदावर्ते, मिनाज पठाण,उत्तम गायकवाड आदींनी नेतृत्व केले.