कुसुमताई प्राथमिक शाळेच्यी आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी
नवीन नांदेडl आषाढी एकादशी निमित्त शाळेला सुट्टी असल्यामुळे आम्ही आज आषाढी कार्तिकी सोहळा निमित्त कुसुमताई प्राथमिक शाळा सिडको नांदेड येथे विद्यार्थ्यांनी(मुले/मुली) वारकऱ्यांच्या वेशभूषा परिधान करून विठ्ठलाचे नामस्मरण करण्यात आले.
सामाजिक,वैयक्तिक संस्कृती, रूढी परंपरा जपणे हा होय.अवघी पंढरीच येथे अवतरली आहे,असे दृष्टिक्षेपात आले, विठ्ठलाच्या नावाचे गजराने अक्षरशः शाळा दुमदुमली. वेशभूषातील मुले मुली वरून राजाच्या साक्षीने आनंदाने पावले खेळत, हृदयातून आनंद व्यक्त करत विठ्ठलाच्या नामाचा गजर झाला.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका,सर्व सहशिक्षक,शिक्षिका यांनी सुद्धा विठ्ठलाच्या गाण्यावरती ठेका धरत आनंद व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्या साठी सौ.ऊषा कारामुंगे संग्राम चव्हाण,संजय सुयवशी,मेरवान जाधव, मिलिंद जाधव, गणेश गव्हाणे,मारोती पेटें, व्यंकट गायकवाड, शिंदे, सौ.श्यामसुंदरी मुंडे, शिवानंद गोरे,सुनंदा वाघमारे, राजश्रीअडकुणे, भालेराव ,भुताळे, सांस्कृतिक प्रमुख सौ.पुष्पा निलपत्रेवार यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या केला.