नायगाव येथील श्री साईबाबा मंदिरात दसरा निमित्ताने दर्शनासाठी भाविकांची गर्दी

नायगाव, रामप्रसाद चन्नावार। शिर्डी प्रतिरुप समजले जाणाऱ्या नवसाला पावणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नायगाव येथील पानसरे नगरातील साईबाबा मंदिरात दसरा साईबाबा पुण्यतिथी निमित्ताने नवरात्र महोत्सव विविध कार्यक्रमाने थाटात साजरा करण्यात आला.
नायगाव येथील पानसरे नगरातील साईबाबा मंदिरात साईबाबा पुण्यतिथी दसरा नवरात्र निमित्ताने सात दिवस काकड आरती महाअभिषेक पूजा, मध्यान आरती, धुपारती, शेजारती, साई सच्चरित्र पोथीचे पारायण आदी सहविविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते दसरा निमित्ताने मंदिररात रंगीबेरंगी फुलाने सजवण्यात आले होते.
दसऱ्याच्या दिवशी महाभिषेक महाआरती करण्यात आली दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी केशवराव पाटील चव्हाण, विजय पाटील चव्हाण, पांडू पाटील चव्हाण पंढरी भालेराव.प्रल्हाद पाटील बोंमनाळे, संजय चव्हाण ,नारायण जाधव, विठ्ठल बेळगे, श्रीनिवास शिंदे,साईनाथ चन्नावार. शरद भालेराव विजय भालेराव. दत्ता मामा येवते. साई महाराज शहापुरे आदींची उपस्थिती होती.
