करियरनांदेड

ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल चा विद्यार्थी कृष्णा श्रीजीपालवार यांने प्रथम क्रमांक पटकावला

नायगाव, रामप्रसाद चन्नावार। विभागीय स्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा 2023-24 दिनांक 22 व 23 ऑक्टोंबर 2023 ला लातूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. मैदानी क्रीडा प्रकारातील तिहेरी उडी ( triple jump ) स्पर्धेत ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल खैरगाव शाळेचा विद्यार्थी कृष्णा माधवराव श्रीजीपालवार याने प्रथम क्रमांक पटकावला.

तर कु तन्वी गोविंदराव शिंदे हिने तृतीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. तसेच त्यांची चंद्रपूर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे सचिव मा.श्री. कुमुदकांतजी पटेल सर यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांसह यथोचित शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सरोजा धरणे पर्यवेक्षक आनंद पांचाळ, अर्जुन बैस, स्पोर्ट विभाग प्रमुख शरद कपाटे सर, स्पोर्ट्स शिक्षक नागनाथ नागरवार सर यांच्यासह शाळेतील सर्व अध्यापक, अध्यापिका ,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस मन: पूर्वक शुभेच्छा दिल्या.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!