
हिमायतनगर/उमरी/नांदेड। दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी उमरी येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन उमरी येथे दोन आयशर टेम्पो कत्तलीसाठी प्राणी घेऊन येत असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार स.पो. निरीक्षक श्री चेवले साहेब आणि सपोनी श्री कदम यांनी गांभीर्याने दखल घेत तातडीने सदरील वाहन मामा चौक येथे बंदोबस्त लावुन पकडले ज्यामध्ये 39 म्हशी ज्या अतिशय क्रूरपणे चारी पाय बांधलेले आणि शिंगदेखील वर धरून बांधलेले अतिशय दाटीवाटीने भरलेल्या आढळून आल्या होत्या. यापैकी बहुतांशी म्हशी जखमी अवस्थेत आढळुन आल्या तर एक म्हैस टेम्पोतच मृत्युमुखी पडलेली आढळुन आली होती. त्यानुसार ऊमरी पोलीस स्टेशन येथे गुरनं. 0052/2024 नोंद करून सदरील सर्व पशु देवकृपा गोशाळा तथा गोविज्ञान केंद्र, पवना, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड येथे उपचार आणि संगोपनासाठी पाठवले होते.
या प्रकरणातील म्हशी आणि आयचर टेम्पो परत मिळावा यासाठी अब्दुल माजीद अब्दुल नबी रा. येडापल्ली, जिल्हा निझामबाद यांनी सदरील म्हशी हे कत्तलीसाठी नेत नसुन शेतीच्या कामासाठी नेत असल्याचे ऊमरी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात नमूद केले होते. त्यामुळे मा. न्यायालयाने सदरचे पशु आमच्या ताब्यात द्यावे याकरिता दावा दाखल केला होता.
सदरील प्रकरणात देवकृपा गोशाळेच्या वतीने ॲड जगदीशजी हाके साहेब यांनी या दाव्यावर आक्षेप घेऊन हे सर्व म्हशी नांदेड येथे कत्तलीसाठी नेत आहेत. कारण शेतीसाठी कोणताही शेतकरी किंवा शेतीसाठी खरेदी विक्री करणारा व्यापारी अशाप्रकारे अत्यंत क्रुरपणे, दाटीवाटीने, निर्दयीपणे ईजा होईल आणि मृत्यु पावेल अशा पद्धतीने नेतच नाहीत. म्हणुनच आपण संबंधित अर्जदार मा न्यायालयाची दिशाभुल करून सदरील गुन्हयातील पशु कत्तलीसाठी देण्याची दाट शक्यता आहे. म्हणुन संबंधित अर्जदारांचे चारही अर्ज रद्द करावेत. अशी विनंती केली होती ते विनंती मान्य करून संबंधित पशु गोशाळेच्या ताब्यात ठेवावे अशी गोशाळेच्या वतीने विनंती ॲड जगदीशजी हाके सर, ॲड राखे सर सर यांनी भक्कमपणे न्यायालयापुढे मांडली होती ते विनंती मा न्यायाधीश श्री ए. बी . रेडकर साहेबांनी दोन्ही पक्षाची बाजु ऐकुन देवकृपा गोशाळेचे आक्षेप मान्य केले आहेत. ॲड चिकटवाड यांनी देखील या प्रकरणी सहकार्य केले आहे. तर ऊमरी पोलीसांप्रमाने जिल्ह्यातील ईतर पोलीस अधिकाऱ्यांनी निश्पक्ष तपास करून योग्य कलमानुसार गुन्हे दाखल केले तर गोहत्येवर लवकर अंकुश मिळेल, ऊमरी पोलीसांचे परीसरात आणि जिल्ह्यात कौतुक केले जात आहे.
यावेळी विश्व हिंदु परिषदेचे नांदेड विभाग गोरक्षा प्रमुख किरण सुभाष बिच्चेवार म्हणाले, नांदेड जिल्हा तेलंगणा राज्यास लागुन असल्याने जिल्ह्यातुन खुप मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तलीसाठी वाहतुक होते. यासोबतच नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी अवैध कत्तल खान्यांमधुन हजारो गोवंशाची नियमितपणे कत्तल सुरू आहे. हे कत्तलखाने उध्वस्त केले पाहिजे यासाठी आम्ही दि 08/02/2024 रोजी धरने आंदोलन केले होते. पण अजुनही जिल्ह्यातील अवैध कत्तलखाने बंद केले गेले नाहीत. याच्या विरोधात आम्ही लवकरच पुन्हा एकवेळ लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत.या यशाचे सर्व श्रेय समाजातील दानशुर दात्यांनाच जाते, तर गोरक्षणाची लढाई यशस्वीपणे पार पाडण्याचे श्रेय विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि समाजातील शुर गोरक्षक कार्यकर्त्यांना जाते. अशी प्रतिक्रिया, किरण सुभाष बिच्चेवार,नांदेड विभाग गोरक्षा प्रमुख,विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांतयांनी दिली.
