करियरनांदेडलातूर

विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगाराबाबत माहिती मिळणार एकाच ठिकाणी

नांदेड| मराठवाड्यातील युवक-युवतींना लातूर येथे 23 व 24 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या करिअर मार्गदर्शन शिबीर आणि विभागीय नमो महारोजगार मेळाव्यामुळे रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळणार आहे.

लातूर शहरातील महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानावर आयोजित या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी युवक-युवतींनी https://nmrmlatur.in या संकेतस्थळवर ऑनलाईन नाव नोंदणी करण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि लातूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.

युवक-युवतींना व्यवसाय, स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत माहिती देण्यासाठी 23 फेब्रुवारी रोजी करिअर मार्गदर्शन शिबीर होणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील नामांकित आणि तज्ज्ञ व्यावसायिक, उद्योजक यांचे मार्गदर्शन आणि अनुभव कथन करणार आहेत. तसेच व्यवसाय, स्वयंरोजगाराची निवड करीत स्टार्टअप उद्योग, व्यवसायांची माहिती देणारी विविध दालने याठिकाणी उभारण्यात येणार आहेत. स्वयंरोजगारासाठी, उद्योगासाठी सहाय्य करण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी विविध शासकीय विभाग, महामंडळे आणि बँकांची स्वतंत्र दालने राहतील.

नमो महारोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधा
नमो महारोजगार मेळाव्यामध्ये मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर शहरासह राज्यातील विविध ठिकाणहून उद्योजक उपस्थित राहून मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करणार आहेत. यासाठी 24 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 पासूनच लातूर शहरातील बार्शी रोडवरील महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानावर मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता दहावी, बारावी, तसेच विविध विषयातील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, आयटीआय (सर्व ट्रेड) आदी शैक्षणिक पात्रताधारक उमेदवार या मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करू शकणार आहेत. यासाठी https://nmrmlatur.in हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!