नांदेड। श्री गुरु नानक देवजी नगर नंदीग्राम सोसायटी येथील रहिवाशी आणि श्री हजुरसाहिब आयटीआयचे मुख्य प्रशिक्षक सरदार भीमसिंघ बेल्थरवाले यांच्या मातोश्री हरकौर भ्र. स्व लखमणसिंघ बेल्थरवाले यांचा वृद्धापकाळामुळे दि. 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता दरम्यान निधन झाले. शेवटच्या क्षणी त्यांचे वय जवळपास 95 वर्षें होते.

बुधवार दि. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता नगीनाघाट शमशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येत समाज बांधव, नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होता. त्यांच्या मागे कुटुंबात चार मुलं, दोन मुली आणि नाटवंड असा मोठा परिवार शोकाकुल झाला आहे.

