बाभूळगाव येथे दत्त नाम चातुर्मास समाप्ती व कलशारोहन सोहळा उत्साहात संपन्न
नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील मौजे बाभूळगाव येथे अखंड दत्त नाम चातुर्मास समाप्ती व महादेव मंदिर येथे महादेव पिंड मुर्ती कलशारोहन सोहळा हभप पांडू महाराज आनंदगिरी यांच्या हस्ते करण्यात आली, यावेळी गावातील प्रत्येक कुटुंबांनी रांगोळी विधीवत पालखी व हभप समगिर महाराज यांच्ये पुजन करून ढोलताशांच्या, फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये भव्य मिरवणूक स्वागत केले.
बाभूळगाव येथे सन 1983 पासून सुरू असलेली परंपरा कायम ठेवत सुरुवात श्री पांडू महाराज आनंदगिरी महाराज व आता दतभप समगिर महाराज यांच्याहस्ते यांच्या हस्ते २० डिसेंबर रोजी प्रथम कलश पूजन करून दत्त चातुर्मास समाप्ती निमित्त पालखीचे पूजन करून गावात भजन मंडळी सह पारंपारिक ढोल ताष्शाच्या गजरात फटाक्याच्या आतिष बाजीत संपूर्ण गावात पालखी परिक्रमा काढण्यात आली रस्त्यावर गावातील महिलांनी रांगोळी काढून पालखीचे पूजन करून स्वागत केले व महादेव मंदिर कलशाची आरती करून कलशारोहन करण्यात आले.
तर दतमंदीर येथे चातुर्मास संमाप्ती निमित्ताने महाआरती करण्यात आली यावेळी समस्त गावकरी मंडळीं, महिला,जेषठ नागरीक, युवक लहान मुलै ,यांचा सह परिसरातील भाविक भक्ताची मोठया संख्येने उपस्थिती होती, यावेळी महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली तर सवा खंडी तांदूळ महापूजा व काकाड आरतीने चातुर्मास संपन्न होणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी गर्दी केली.