क्राईमनांदेड

पारदर्शक चौकशीची वनसंरक्षक धुमाळ यांना एलर्जी.? वनबल प्रमुखांच्या आदेशाला केराची टोपली

किनवट/नांदेड, अनिल मादसवार| ठोस आणि सबळ पुरावे सादर करा नाहीं तर चौकशी बंद करू असे नेहमीचं म्हणणाऱ्या उप वनसंरक्षक यांना ठोस आणि सबळ पुरावे सादर केलेले असतांनाही चौकशी टाळली जाते म्हणजे या अवैध वृक्ष तोडीस त्यांचे खुले पाठबळ तर नाहीं ना अशी शंका स्पष्ट दिसतं आहे.

किनवट आणि बोधडी मधील राखीव जंगलात सागवान झाडांची होणारी अवैध वृक्ष तोड थांबवण्यासाठी आणि वृक्ष तोडीस सहकार्य करणारे अधिकारी यांचा वर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनात विधानभवन परिसरात आमरण उपोषण आणि मुख्यमंत्री यांचे दालनात आत्मदहन आंदोलनाचा पवित्रा घेतलेल्या सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाठोरे यांना पोलीस अधीक्षक कार्यालय नागपूर यांचे आदेशाने सदर बाजार पोलीस निरीक्षक आणि त्यांचे सहकारी यांनी मा.प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. टेंभुर्णीकर साहेब (वनबल प्रमुख) महाराष्ट्र राज्य कार्यालय नागपूर यांची भेट घालून दिली होती.

त्यावेळी झालेल्या चर्चे नुसार त्यांचे आदेशाने मा.डॉ.प्रवीण चव्हाण अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक साहेब (संरक्षण) नागपूर यांनी किनवट आणि बोधडी वनपरिक्षेत्र कार्यालय मधे झालेल्या सागवान झाडांचा अवैध वृक्ष तोड प्रकरणी छत्रपती संभाजीनगर कार्यालयाचे वनसंरक्षक धुमाळ साहेब यांना दक्षता पथक मार्फत विभागीय समिती गठित करून चौकशी करण्याचे आदेशित केले असतानाही वनसंरक्षक नांदेड वाबळे यांनी पाठवलेल्या खोट्या आणि दिशाभूल करणारा अहवाल ग्राह्य धरत तक्रारधारक यांनी मागणी केलेल्या पारदर्शक चौकशीला बगल दिली आहे. वनसंरक्षकांनी सरळ सरळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशास केराचीच टोपली दाखवली आहे.सदरील प्रकरणी न्याय मिळत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते यांनी दिनांक 26 डिसेंबर 2023 पासून वनसंरक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर कार्यालय समोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाला सुरुवात करत असल्या बाबत पत्र ई मैल द्वारे पाठवले आहे.

मराठवाड्यातील एकमेव जंगल असलेल्या किनवट तालुक्याला मौल्यवान आणि टिकावू अश्या सागवान लाकडाच्या जंगलाने व्यापलेले आहे.एकीकडे शासन 2 कोटी,33 कोटी,50 कोटी वृक्ष लागवड अश्या विविध प्रकारच्या योजना आखून झाडे लागवड करताना दिसत आहे.तर दुसरीकडे ज्यांचावर येथील पूर्णत वाढ झालेल्या राखीव जंगलाच्या रक्षणाची जबाबदारी दिलेली आहे अश्या वन विभागातील कर्मचाऱ्यांत राखीव जंगल नष्ट कसे होईल हे बघण्यात चढाओढ लागलेली दिसतं आहे. किनवट आणि बोधडी या दोन्ही वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय अंतर्गत असलेल्या राखीव जंगलातील अवैध वृक्षतोडीचे प्रकरण ठोस आणि सबळ पुराव्यासह मा.अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक साहेब,(संरक्षण) महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाठोरे यांनी सादर केले होते.ज्याला चौकशी कामी मा.मुख्य वनसंरक्षक औरंगाबाद यांचे कडे तर त्यांनी ते उप वनसंरक्षक नांदेड येथील मा.वाबळे साहेबांकडे वर्ग करण्यात आलेले होते.ते त्यांनी सहायक वनसंरक्षक नांदेड यांचे कडे चौकशी कामी दिले होते.अशी ही टोलवाटोलवी होत आहे परंतु ठोस आणि सबळ अशी कोणतीही कार्यवाही अवैध वृक्ष तोड थांबवण्यासाठी होताना दिसत नाही आहे.

चौकशी साठी ठोस आणि सबळ पुरावे सादर करा नाहीतर चौकशी बंद करू असे पत्रव्यवहार करत चौकशीसाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेलेले आजपर्यंत घडलेले आहे. तत्कालीन चौकशी अधिकारी लखमावाड सहायक वनसंरक्षक नांदेड यांना प्रत्यक्ष भेटून ठोस आणि सबळ पुरावे सादर केलेले असतांनाही वनसंरक्षक यांनी पुरावेच सादर केलेले नसल्याने तक्रार नस्ती बंद करण्याचे कळविले आहे. मुळात तक्रार धारक यांना न बोलावता चौकशी पूर्ण होवूच शकत नाही तक्रार धारक दाखवेल तिथे चौकशी प्रत्यक्ष जायमोक्यावर जावून पूर्ण होईल परंतु वनसंरक्षक धुमाळ साहेबांचा पत्रावरून असेच दिसतं आहे की त्यांना पारदर्शक चौकशी नको आहे. एकंदर परिस्थिती बघता पारदर्शक चौकशीची त्यांस एलर्जी झालेली दिसत आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!