
बिलोली| तालुक्यातील मौजे तळणी येथील गावतील मुख्य सि. सि. रस्ते नाली व इतर कामे बांधकाम मुख्यमंत्री सहाय्याता निधी मधून गावाच्या विकास करण्यासाठी मंजूर करण्यात आले असल्याने ग्राम पंचायतच्या वतीने हे कामे जोमाने करण्यात येत आहेत. पण गावातील कांही कुबुध्दीचे लोकांनी कामाची वारंवार अडवूनक करीत असल्यामुळे गावच्या विविध विकास कामात अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार गावचे सरपंच व सदस्यानी गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
सध्या गावात मुख्यमंत्री सहाय्याता निधी अंतर्गत प्र.रा. मा. -२ चे रस्ता तळणी ते जिंगळा जाण्यासाठी सि. सि. रस्ता काम चालु आहे. तळणी येथील ग्राम पंचायत ते मेन रोड पर्यंत लांबी १०० फुट व रुंदी ३० फुटाचा रस्ता ग्राम पंचायत नमुना नंबर २३ ला नोंद असून त्याच प्रमाणे रस्त्याचे काम चालु आहे. पण त्या रस्त्या लगत लक्ष्मण चंद्रप्पा मुजळगे यांची शेती असल्याने संबंधित शेतकरी माझी शेतीचे मोजनी होईपर्यत काम बंद ठेवण्याचे अर्जे बाजारी केले. गावातील काही नागरीक व ग्रामपंचायत सदस्य मिळून हे काम करणे चालू केले आहे .
तरी मुजळगे यांनी काम बंद करण्याच्या हेतुने अर्ज बाजारी व जमीन मोजणी करण्याच्या नावावर वारंवार कामाची अडवून करीत असल्याने या कामासह अनेक वर्षापासून गावचे रखडलेल्या विविध विकास कामात अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः त्या जमीनीच्या बाजुन १५ ते १६ वर्षाखाली सि. सि. नालीचे काम गावातील घाण पाणी जाण्यासाठी काढण्यात आले होते. पण सद्यस्थित संबंधिताने नाली जे.सी. बीच्या सहयाने बुजून टाकले आहे. म्हणून संबंधित शेतकरी लक्ष्मण मुजळगे, सुरेश मुजळगे या दोघांची चौकशी करून कारवाई करावी व गावचे विविध कामे गतीमान करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर कारवाई करावी अशी मागणी तळणी गावचे सरपंच व सर्व सदस्यांनी गट विकास अधिकाऱ्याकडे केली आहे.
