नांदेड| रेल्वे स्थानक व रेल्वेमध्ये , दिव्यांग, इतर गोरगरीब फेरीवाले साहित्य विकून आपली उपजिवीका भागवित असतात रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सदरील विक्रेत्यांचे साहित्य जप्त केले होते. ही बाब आ. मोहन अण्णा हंबर्डे यांना समजताच त्यांनी रेल्वे अधिकाऱ्याचे कार्यालय गाठत अधिकाऱ्यास जाब विचारून चांगलेच धारेवर धरले. यावेळी अधिकाऱ्यांनी जप्त केलेले साहित्य परत केले.
दि.२३ रोजी नांदेड गंगानगर एक्सप्रेसमध्ये नित्यनेमाने फेरीवाल्याकडून अल्पोपहार व इतर साहित्य विक्री करत असताना . रेल्वे अधिकाऱ्यांनी दिव्यांगांचे सर्व साहित्य जप्त केले आहे अशी माहिती आ. मोहन हंबर्डे यांना मिळाली. काही मिनिटांत आ. हंबर्डे यांनी रेल्वे स्टेशन प्रबंधक यांचे कार्यालय गाठले. सर्व दिव्यांग बांधवांसोबत जाऊन रेल्वे स्टेशन प्रबंधक व अन्य कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले व गोरगरीब दिव्यांग बांधव असोत वा रेल्वेत विक्री करणारे गोरगरीब कष्टकरी महिला वर्ग ते कुणीही असो त्यांना यापुढे त्रास होता कामा नये असा दम दिला.
रेल्वे अधिकाऱ्यांना आ. मोहनराव हंबर्डे यांनी सुनावताच जप्त केलेले सर्व साहित्य परत केले. आ. मोहन हंबर्डे यांच्या तत्परतेमुळे गोरीगरीब दिव्यांग बांधव व फेरीवाल्यांना न्याय मिळाला. या पुढे कोणाला ही त्रास होता कामा नये असा इशारा आ. हंबर्डे यांनी दिला.